विश्वसंचार

कासवाने वाचवले ‘दोस्त’ माशाचे प्राण

Pudhari News

नवी दिल्ली : कधी कधी नकळतपणेही एखाद्याला आपली मदत होऊ शकते. असाच प्रकार एका माशाबाबत झाला. पाण्याबाहेर आलेल्या माशाला एका कासवाने अशीच नकळत 'मदत' केली व हा मासा पुन्हा पाण्यात गेला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले!

याबाबतचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यामध्ये असे दिसते की हा मासा पाण्यातील एका खडकावर पडला आहे. पाण्यातून एक कासव त्याच्याजवळ येते व त्याला तोंडाने ओढू लागते. कदाचित त्याला हा मासा खायचा होता म्हणून ते असा प्रयत्न करीत होते. मात्र, त्याच्या या ओढण्यामुळे मासा पाण्यात ओढला गेला व लगेचच तो विजेच्या चपळाईने पुढे निघून गेला. या व्हिडीओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींना कासवाने आपल्या मित्राला मदत केली असल्याचेही वाटले व त्यावरून लोकांनीही माणुसकीचा धडा घ्यावा असे म्हटले! या व्हिडीओला दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून पाच हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT