Child Throws iPhone | ...आणि बाळाने नावेतून नदीत फेकला आईचा आयफोन! 
विश्वसंचार

Child Throws iPhone | ...आणि बाळाने नावेतून नदीत फेकला आईचा आयफोन!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सोशल मीडियाच्या विश्वात कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. नुकताच एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून आयफोन प्रेमींचा काळजाचा ठोका चुकला आहे. एका आईने बोटीवर बसलेल्या आपल्या लहान मुलाला शांत करण्यासाठी जसा हातातील महागडा आयफोन दिला, तसा त्या लहान मुलाने पुढच्याच क्षणी असा काही पराक्रम केला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चिमुरड्याने तो फोन थेट नदीत फेकून दिला!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी तर हा व्हिडीओ ‘फेक’ (खोटा) असल्याचा दावा केला, तर काहींनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ नक्की खरा आहे की खोटा? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर या घटनेमागचे संपूर्ण सत्य आता समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लुधियाना येथील चिमुरड्या ‘जॅस्पर थापर’चे एक अकाऊंट आहे. @jasperthaper नावाचे हे अकाऊंट जॅस्परचे आई-वडील सांभाळतात, ज्याला सुमारे ५ हजार फॉलोअर्स आहेत. पण, नुकत्याच अपलोड झालेल्या त्यांच्या एका व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजवून दिली आहे.

व्हायरल क्लिपमध्ये एक आई आपल्या लहान मुलासोबत बोटीतून प्रवास करताना दिसत आहे. मुलाला खेळवण्यासाठी ती जसा आपला आयफोन त्याच्या हातात देते, तसा तो मूल एक क्षणही न गमावता तो फोन थेट नदीच्या खोल पाण्यात फेकून देतो. मुलाने तो फोन इतक्या सहजतेने पाण्यात फेकला, जणू तो फोन त्याला पाण्यात फेकण्यासाठीच दिला होता. यानंतर आईच्या चेहऱ्यावर जे आश्चर्य आणि धक्क्याचे भाव आले, त्याने सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेढून घेतले.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, तो फोन नक्की खरा होता का आणि तो परत मिळाला का? यावर जॅस्परच्या पालकांनी कॅप्शनमध्ये स्पष्ट केले की, ‘‘तो आयफोन पूर्णपणे खरा होता आणि मुलाने तो खरोखरच पाण्यात फेकला. फोन पडल्यानंतर तो पुन्हा परत मिळाला नाही.’’ पालकांनी पुढे स्पष्ट केले की, हा कोणताही स्क्रिप्टेड ड्रामा किंवा पब्लिसिटी स्टंट नव्हता, तर एक अपघाती घटना होती ज्यामध्ये त्यांचा आयफोन कायमचा नदीत वाहून गेला. त्यांचा कोणताही व्हायरल व्हिडीओ बनवण्याचा उद्देश नव्हता, तर कौटुंबिक प्रवासादरम्यान अचानक घडलेली ही एक खरी घटना होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT