विश्वसंचार

जमिनीखालून बाहेर आल्या तीन मगरी!

Arun Patil

नवी दिल्ली : सोशल मीडियात अनेक वेळा अतिशय धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळत असतात. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसते की जमिनीवरील प्लास्टर फोडल्यावर खालून चक्क तीन मगरी बाहेर आल्या! या मगरी आत कशा गेल्या व कशा राहिल्या हे एक कोडेच आहे!

आपण मगरी पाण्यात पाहतो. परंतु, सध्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मगरी या जमिनीतून आल्या आहेत. हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकांना अजून शंका आहे की, त्या मगरी जमिनीच्या खाली कशा गेल्या. ज्यावेळी एका मगरीच्या तोंडाला दोर बांधला, त्यानंतर त्या मगरीच्या मागून अजून एक मगर तिथून बाहेर आली. ज्यावेळी दुसरी मगर पटकन बाहेर येते त्यावेळी तिथे असलेल्या लोकांमध्ये मोठी खळबळ माजली. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे देवा हे सगळे तिथे काय करीत आहेत? 22 सेकंदांचा तो व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला अधिक कमेंटसुद्धा आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक अधिक घाबरली आहेत. एका वेबसाईटने सांगितले आहे की, शेजारी घराच्या जमिनीतून आवाज येत होता. त्यांना शंका आली खाली दोन प्राण्यांचे भांडण लागले आहे. त्यामुळे जमिनीवरती प्लास्टर होतं. त्यावेळी जमिनीची एक बाजू फक्त तुटली होती. लोकांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना एक मगर दिसली. मगर पकडण्यासाठीची व्यवस्था करून हे प्लास्टर फोडल्यावर आतून तीन मगरी बाहेर आल्या! त्यांना पकडण्यात यश आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT