Polling Booth | ‘या’ मतदान केंद्रावर येतो फक्त १ मतदार  
विश्वसंचार

Polling Booth | ‘या’ मतदान केंद्रावर येतो फक्त १ मतदार

पुढारी वृत्तसेवा

गांधीनगर : भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक मताला सारखेच महत्त्व दिले जाते. देशात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. परंतु, गुजरातमध्ये एक असे अनोखे मतदान केंद्र आहे, तेथे मतदान करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच मतदार येतो. या एका मतदाराच्या जागरूकतेमुळे येथे प्रत्येक निवडणुकीत १०० टक्के मतदान नोंदवले जाते.

गीरच्या जंगलातील अनोखा बूथ

गुजरातच्या दाहोद जिल्हा आणि गीरच्या जंगलातील दुर्गम भागात वसलेले हे मतदान केंद्र भारतातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण पोलिंग बूथ मानले जाते. या संपूर्ण भागात केवळ एकच नोंदणीकृत मतदार आहे. असे असले तरी, निवडणूक आयोग या एका मतदारासाठी पूर्ण गांभीर्याने आणि उत्साहाने तयारी करतो. निवडणुकांच्या वेळी येथे रीतसर टेंट लावला जातो, ईव्हीएम मशिन ठेवले जाते, निवडणूक अधिकारी आणि कडक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात.

कोण आहे हा एकमेव मतदार?

हा मतदार स्थानिक रहिवासी असून, तो प्रत्येक निवडणुकीत वेळेवर पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावतो. हवामान कसेही असले, तरी तो कधीही मतदान चुकवत नाही. त्याच्या याच एका मतामुळे या बूथची मतदानाची टक्केवारी नेहमी १००% राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT