या धबधब्याच्या मागे सतत आग जळते. Pudhari File Photo
विश्वसंचार

असाही धबधबा, ज्याखाली सतत जळत असते आग!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : निसर्गात अनेक रहस्यमय गोष्टी दडलेल्या आहेत. त्यातील बहुतांश रहस्यांची उकल आजही झालेली नाही. निसर्गात आजही अनेक चमत्कारिक गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळतात. त्यापैकी काही गोष्टींवर संशोधन झाले असून, त्याचे निष्कर्ष सर्वश्रुत आहेत. काही गोष्टींवर संशोधन होऊनदेखील त्यातील रहस्याची उकल झालेली नाही; पण यामुळे या गोष्टींचे आकर्षण तसूभरही कमी झालेले नाही.

न्यूयॉर्कमधला एक रहस्यमयी धबधबा

न्यूयॉर्कमधला असाच एक धबधबा रहस्यमय मानला जातो. या धबधब्याच्या आत सतत अग्नी पेटलेला असतो. हे एक पर्यटनस्थळ असून दर वर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. त्यापैकी बहुतेक गोष्टी रहस्यमय असून, या रहस्यांची अद्याप उकल झालेली नाही. न्यूयॉर्कमध्ये अशीच एक रहस्यमय जागा आहे. या जागेवर एक धबधबा असून तो रहस्यमय मानला जातो. या धबधब्याच्या मागे सतत आग धगधगत असते. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.

या धबधब्याच्या मागे सतत आग जळते

फॅमिली डेस्टिनेशन म्हणून हे ठिकाण परिचित आहे.न्यूयॉर्कमधला इटर्नल फ्लेम फॉल्स रहस्यमय मानला जातो. या धबधब्याच्या मागे सतत आग जळत असते. एरी काऊंटीमधल्या चेस्टनट रिज पार्कमधल्या 18 माइल क्रीक आणि वेस्ट ब्रॅंच कॅझेनोव्हिया क्रीक व्हॅली दरम्यानच्या टेकड्यांच्या उत्तरेकडील टोकाला 1213 एकर क्षेत्रावर हा धबधबा आहे. हे पार्क सर्वोत्तम समर फॅमिली डेस्टिनेशन अर्थात उन्हाळी सहलीसाठी योग्य ठिकाण मानले जाते. या ठिकाणी पर्यटकांसाठी पायवाटा, सायकल मार्ग, खेळाची मैदाने, टेनिस कोर्ट आणि सहलीसाठी आवश्यक त्या सुविधा दिल्या जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT