विश्वसंचार

चंद्राबाबत 18 वर्षांनी घडणार ‘ही’ घटना

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्राबाबत नेहमीच आपल्याला कुतूहल असते. आता या चंद्राबाबत तब्बल 18 वर्षांनी एक घटना घडणार आहे. त्यावेळी चंद्र जणू काही एकाच ठिकाणी स्थिर असल्यासारखा वाटेल!

दर 18.6 वर्षांनंतर ही अद्भुत घटना घडते, जिथं चंद्राच्या हालचाली जणू थांबतात. चंद्र थांबणार म्हणजे नेमकं काय होणार? अभ्यासकांच्या मते, चंद्र स्थिर होणार म्हणजे, क्षितिजापासून सर्वात दूरच्या अंतरावर एका विशिष्ट ठिकाणी किंवा बिंदूवर त्याचा उदय आणि अस्त होणार आहे. या दोन्ही नैसर्गिक घटनांमधील वेळेचं अंतर वाढणार असून, आभाळातील सर्वाधिक उंचीवरील आणि नीचांकी बिंदूवर या क्रिया पार पडणार आहेत.

2006 नंतर ही अद्भुत घटना घडणार असून, हा तोच प्रसंग असेल जिथं क्षितिजावर सर्वात दूर चंद्रोदय होणार असून, तिथंच दूर दक्षिणेकडे चंद्रास्तही होणार आहे. दर 18.6 वर्षांमध्ये चंद्राच्या गतीमध्ये हा बदल होत असून, हे चंद्राचं कालचक्र आहे, असं सांगण्यात येतं. चंद्रोदय आणि चंद्रास्ताची दिशा ही सूर्याप्रमाणं नसून, ती सतत बदलत असते. यंदाच्या वर्षी होणारी ही घटना आणि हे अद्भुत बदल सप्टेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान पाहता येणार आहेत.

SCROLL FOR NEXT