विश्वसंचार

महाराणी एलिझाबेथच्या महालात लपवली होती ‘ही’ बाटली!

Arun Patil

लंडन : कधी कधी जुन्या घरांमध्ये अनेक अनोख्या वस्तू, लपवलेले साहित्यही सापडत असते. विशेषतः पाश्चात्य जगतातून तशा बातम्या अनेक वेळा आलेल्या आहेत. असंच काहीसं इंग्लंडमध्ये घडलं आहे. इंग्लंडच्या जर्सीमध्ये दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या महालात जे सापडलं हे पाहून सारे आश्चर्यात पडले. हे 1966 मधील एका बॉटलमधील संदेशाबाबतचं प्रकरण आहे. या संदेशात काय होतं आणि ते एलिझाबेथ यांच्या महालात ते कसे सापडले, यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आहे.

या बाटलीतील मेसेज हा थेट जासूस कॅरेक्टर जेम्स बॉण्डच्या नावाने होता.जर्सी हेरिटेजने सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट करत सांगितलं की, एलिझाबेथ महालात अधिकार्‍यांच्या क्वॉर्टरच्या पहिल्या माळ्यावर डागडुजीचं काम करणार्‍या मजुरांनी जेव्हा चिमनी उघडली तेव्हा त्यांना त्याच्या आत एका बाटलीत एक संदेश सापडला. 26 फेब्रुवारी 1966 च्या या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे, नक्कीच हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

'007 जेम्स बॉण्ड, 26 फेब्रुवारी 1966. पी. एस. सीक्रेट एजंट. कोणाला सांगू नका.', असं या पत्रात लिहिलं होतं. तर या पत्राच्या मागे लिहिलं आहे की, 'ई. ए. ब्लॅम्पिड', ज्यांचा 1966 मध्ये मृत्यू झाला होता. हे पत्र शॉन कॉनरी यांच्या जेम्स बॉण्ड फिल्म थंडरबॉलच्या रीलिजच्या दोन महिन्यांनी लिहिण्यात आलं होतं. जर्सी हेरिटेजने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आम्हाला या रहस्यमयी पत्राबाबत तुमच्या मदतीची गरज आहे.' या बाटलीतील पत्राबाबत जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

SCROLL FOR NEXT