black hole universe | ब्रह्मांडात आढळले ‘खादाड’ कृष्णविवर 
विश्वसंचार

black hole universe | ब्रह्मांडात आढळले ‘खादाड’ कृष्णविवर

विज्ञानाचे दोन महत्त्वाचे नियम मोडीत काढल्याने शास्त्रज्ञ चकित

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील एका अशा कृष्णविवराचा शोध लावला आहे, जो विज्ञानाचे प्रस्थापित नियम धाब्यावर बसवत आहे. ‘ID830’ नावाचा हा क्वेसार (Quasar) केवळ त्याच्या वाढीच्या मर्यादेपेक्षा वेगाने वाढत नाहीये, तर तो एकाच वेळी प्रचंड प्रमाणात क्ष-किरण आणि रेडिओ लहरींचे उत्सर्जनदेखील करत आहे. विज्ञानानुसार या दोन गोष्टी एकाच वेळी घडणे दुर्मीळ मानले जाते.

ID830 हा एक अत्यंत तेजस्वी आणि सक्रिय ‘सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल’ आहे. त्याच्या ध्रुवांतून रेडिएशनचे प्रचंड झोत बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर, या कृष्णविवराच्या मुखाभोवती प्रकाशाच्या वेगाने फिरणार्‍या पदार्थांमुळे त्यातून तीव्र क्ष-किरण उत्सर्जित होत आहेत. या कृष्णविवराचे वस्तुमान थक्क करणारे आहे. सुमारे 12 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा विश्वाचे वय आजच्या तुलनेत केवळ 15 टक्के होते, तेव्हाच याचे वस्तुमान सूर्याच्या तुलनेत 44 कोटी पट जास्त होते. याचा अर्थ असा की, आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘सॅजिटेरियस ए’ या कृष्णविवरापेक्षा तो 100 पटीने मोठा आहे.

कृष्णविवरांच्या खाण्यापिण्यावरही निसर्गाचे काही निर्बंध असतात, ज्याला ‘एडिंग्टन लिमिट’ म्हटले जाते. जेव्हा कृष्णविवर वायू आणि धूळ स्वतःकडे खेचते, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा रेडिएशनचा दाब अधिक पदार्थ आत येण्यापासून रोखतो. मात्र, ‘ID830’ने या मर्यादेचे उल्लंघन करून अत्यंत वेगाने स्वतःचा आकार वाढवला आहे. ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, संशोधकांनी या ‘वैश्विक खादाडपणाचा’ अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या लहरींचा वापर केला. टेक्सास विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ अँथनी टेलर यांच्या मते, एखादे कृष्णविवर रेडिएशनचा दाब निर्माण होण्यापूर्वी काही काळासाठी मर्यादेपेक्षा जास्त वेगाने पदार्थ गिळंकृत करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT