‘या’ भाज्या खाऊ नयेत कच्च्या Pudhari File Photo
विश्वसंचार

‘या’ भाज्या खाऊ नयेत कच्च्या

पुढारी वृत्तसेवा

काही भाज्या कच्च्या खाणे, अधिक आरोग्यदायी मानले जात असते. मात्र, काही कच्च्या भाज्या परजीवी आणि ई कोलाई किंवा टेपवर्म्स (पट्टकृमी), टेपवार्म अंडी यासारख्या हानिकारक जीवांचे घर असू शकतात. त्यांचा आपल्या आतड्यात, रक्तप्रवाहात आणि आपल्या मेंदूत प्रवेश झाला, तर मोठी हानी होऊ शकते. सिस्टिकरकोसिस, डोकेदुखी, यकृताचे नुकसान आणि स्नायूंमध्ये अगदी अल्सर यासारख्या गंभीर रोगांना ते कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या भाज्या नीट शिजवूनच खाव्यात, असे तज्ज्ञ सांगतात. अशा भाज्यांची ही माहिती...

अळूची पाने :

अळूची पाने आपल्या आहारात वापरण्यापूर्वी त्यांना गरम पाण्यात उकळण्याची शिफारस केली जाते. हाच नियम पालक या हिरव्या भाजीलाही लागू आहे. या भाज्यांची पाने गरम पाण्यात उकळा, कारण ते उच्च ऑक्सलेट पातळीशी जोडलेले आहेत. याव्यतिरिक्त, त्यामध्ये ऑक्सलेट संयुगेदेखील असतात, ज्यामुळे घशात तीव्र खवखव होऊ शकते.

कोबी :

एक सामान्य असलेल्या या भाजीमध्ये अनेक वेळा टेपवर्मची अंडी असू शकतात. ही अंडी आपल्याला कदाचित दिसणारही नाहीत. यापैकी काही टेपवर्म्स चिवट असतात. त्यामुळे फक्त ही भाजी धुऊन घेतल्याने ते नष्ट होत नाहीत. त्यामुळे कोबी सलाड म्हणून खाण्याआधी कोबीला चांगले गरम पाण्यात शिजवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच त्यांनी सांगितले की, या भाजीत गोइट्रोजन आहे, जे थायरॉईडसाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे ही भाजी थायरॉईड रुग्णांनी टाळली पाहिजे.

सिमला मिरची :

या भाजीतील बियांमध्येही अद़ृश्य कीटकांचे वास्तव्य असू शकते. त्यामुळे ही भाजी चिरून त्यातील बिया काढून टाकाव्या आणि भाजी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. शक्यतो सिमला मिरची ही नीट शिजवूनच खाल्ली जाणे हितावह ठरते.

वांगी :

वांग्याच्या बियांमध्येही टेपवर्म अंडी असूशकतात. या परजीवींना नष्ट करण्यासाठी शिजवलेले वांगे खाणे गरजेचे आहे. वांगी नाईटशेड असल्याने कधीही कच्चे सेवन केले जाऊ नये. त्यामध्ये अल्कलॉइडस् आहेत, ज्यामुळे पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT