हिवाळ्यात ‘हे’ स्प्राऊटस्ही गुणकारी Pudhari File Photo
विश्वसंचार

हिवाळ्यात ‘हे’ स्प्राऊटस्ही गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

लहानपणी अनेकांच्या आई किंवा आजीने उकडलेली किंवा कच्चीही मोड आलेली मटकी थोडेसे मीठ लावून खाण्यास दिली असेल. हा नाश्ता खरोखरच आरोग्यदायी ठरतो, असे आता आहारतज्ज्ञही सांगतात. मोड आलेली कडधान्ये प्रथिने आणि अन्य अनेक पोषक तत्त्वांनी संपन्न असतात. हल्ली हे मोड ‘स्प्राऊटस्’ या नावाने लोकांच्या ‘डाएट’मध्ये समाविष्ट झाले आहेत. जर तुम्ही रोज तेच-तेच स्प्राऊटस् खाऊन कंटाळला असाल आणि तुम्ही स्प्राऊटस्साठी वेगवेगळे प्रोटिनयुक्त पदार्थ शोधत असाल तर या स्प्राऊटस्चा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा....

मेथी स्प्राऊटस् :

मधुमेह रुग्णांसाठी स्प्राऊटचे सेवन लाभदायक आहे. ज्या लोकांची रक्तातील साखर नेहमी उच्च असते त्या मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात मेथीदाण्याचे स्प्राऊटस् समाविष्ट केले तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे वजनही नियंत्रणात राहील.

चण्याचे स्प्राऊटस् :

डाळींऐवजी तुम्ही नाश्त्यात चण्याच्या स्प्राऊटस्चे समावेश करू शकतात. कारण चण्याचे स्प्राऊटस् प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे. याशिवाय चण्याच्या स्प्राऊटस्मध्ये लोह, फायबर, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. चणा स्प्राऊटस्मध्ये लिंबाचा रस व थोडे मीठ आणि मिरपूड टाकल्यास चव दुप्पट होते.

शेंगदाणे स्प्राऊटस् :

अनेकजण वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारात प्रथिनांसाठी बाजारात उपलब्ध असलेले पीनट बटरचे अधिक सेवन करतात. परंतु बाजारात मिळणार्‍या पीनट बटरमध्ये अस्वास्थ्यकारक फॅट असू शकते आणि बरेच प्रिझर्व्हेटिव्ह घटकदेखील असतात, ज्यामुळे फायद्याऐवजी आरोग्यास हानी पोहोचू शकते. म्हणूनच तुमच्या आहारात पीनट स्प्राऊटस्चा समावेश करणे हा एक वजन नियंत्रित करण्यासाठी चांगला पर्याय आहे.

बाजरीचे स्प्राऊट :

थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन भरपूर प्रमाणात केले जात असते. याचे कारण बाजरीच्या सेवनाने शरीर आतून ऊबदार राहते. यासाठी जे लोक डाएट करत आहेत ते बाजरीचे स्प्राऊटस् आहारात समाविष्ट करू शकतात. हे एक उष्ण प्रकृतीचे धान्य असले तरी यात प्रथिने, फायबर आणि बर्‍याच पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. हे आतड्याचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. याशिवाय दम्याच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT