विश्वसंचार

हिंदी महासागरात आहे रहस्यमय ‘ग्रॅव्हिटी होल’

Shambhuraj Pachindre

वॉशिंग्टन : पृथ्वीचा आकार सर्वत्र एकसारखाच नाही. तिच्यावरील सर्व पाणी जर हटवले गेले तर दिसून येईल की ती ठिकठिकाणी खोलगट किंवा उंच पृष्ठभागाचीही आहे. पृथ्वीवर सर्व ठिकाणी गुरुत्वाकर्षणही समान नाही हे विशेष. वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात एक असे ठिकाण शोधले आहे ज्याला 'ग्रॅव्हिटी होल' असे म्हटले जाते. महासागराच्या या खोलीत पृथ्वीच्या अन्य भागांच्या तुलनेत कमजोर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की हे ग्रॅव्हिटी होल प्राचीन समुद्राचा अवशेष आहे, जो कोट्यवधी वर्षांपूर्वी नष्ट झाला होता. 'ग्रॅव्हिटी होल' हे पृथ्वीवर सर्वात रहस्यमय गुरुत्वाकर्षण विसंगती मानले जाते. त्याला 'इंडियन ओशन जियोइन लो' (आयओजीएल) या नावाने विज्ञानात ओळखले जाते. हे विशाल ग्रॅव्हिटी होल 30 लाख चौरस किलोमीटरपर्यंत फैलावलेले असून पृथ्वीच्या क्रस्टच्या खाली 950 चौरस किलोमीटरपर्यंत खाली गेलेले आहे. 'जियोफिजिकल रिसर्च लेटर्स'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की हा टेथिस महासागराच्या स्लॅबमध्ये समाविष्ट भाग आहे. टेथिस महासागर हा प्राचीन काळातील महासागर होता जो मेसोजोइक युगात गोंडवाना आणि लॉरेशिया खंडांदरम्यान अस्तित्वात होता. प्रमुख संशोधक देबंजन पाल आणि अत्रेयी घोष यांनी याबाबतची माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT