विश्वसंचार

‘या’ सजीवांना येत नाही झोप!

Arun Patil

नवी दिल्ली : माणसाला तन-मनाच्या विश्रांतीसाठी सात ते आठ तासांची गाढ झोप आवश्यक असते. अपुर्‍या झोपेने किंवा निद्रानाशामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र, निसर्गात असेही अनेक जीव आहेत जे झोप घेत नाहीत किंवा अत्यंत कमी झोप घेतात. त्यांची शरीररचनाच अशी असते की झोपेची त्यांना फारशी गरज नसते.

जगभरात असे अनेक प्राणी, पक्षी आहेत ज्यांना झोप लागत नाही किंवा खूप कमी झोपतात. डॉल्फिन कधीच पूर्णपणे झोपत नाही. ते एक डोळा उघडा ठेवून झोपतात. डॉल्फिनच्या अशा झोपेला 'युनिहेमिस्फेरिक स्लीप' म्हणतात. फ्रि गेट पक्षाला एका तासाची झोप पुरेशी असते. फ्रि गेट पक्षी डॉल्फिनसारखाच एक डोळा बंद करून झोपतो.

फळ माशीदेखील खूप कमी प्रमाणात झोप घेते. ती दिवसभरात 72 मिनिट झोपते. असे म्हणतात की, जेलिफिशला झोपेची गरज नसते. जेलिफिशसारख्या मज्जासंस्था असलेल्या प्राण्यांना झोप येत नाही. बुलफ्रॉगही पूर्णपणे झोपत नाही.

SCROLL FOR NEXT