विश्वसंचार

ट्रेनमध्ये तब्बल नऊ प्रकारचे असतात हॉर्न!

Arun Patil

'झुकझुक गाडी'चे आपल्याला बालवयापासूनच आकर्षण असते; मात्र मोठे झाल्यावरही रेल्वेबाबतची सर्वच माहिती आपल्याला होते असे नाही. त्यामध्ये रेल्वेच्या हॉर्न सिस्टीमचाही समावेश आहे. सर्वात मोठं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. स्वस्त, सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी भारतीयांचे रेल्वेला प्राधान्य असते.

नवीन वर्ष असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत, बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी ट्रेनलाच प्राधान्य देतात. ट्रेनने प्रवास करताना तुम्ही ट्रेनचा हॉर्न अनेकदा ऐकला असेल; मात्र तुम्ही कधी लक्ष देऊन ट्रेनचा हॉर्न ऐकला आहे का? कारण ट्रेनच्या हॉर्नचा आवाज किंवा पॅटर्न हा वेगवेगळा असतो. होय, हे खरं आहे. ट्रेनचे मोटरमन 1-2 नाही, तर तब्बल 9 प्रकारचे हॉर्न वाजवतात. नेमकं काय सांगायचं आहे हे निर्देशित करण्यासाठी असे वेगवेगळे आवाज निश्चित करण्यात आले आहेत.

  1. शॉर्ट हॉर्न – या हॉर्नचा अर्थ ट्रेन यार्डात आली आहे आणि आता ट्रेनच्या साफसफाईचा वेळ आहे असं होता.
  2. 2. शॉर्ट हॉर्न दोनदा – ट्रेन धावण्यासाठी तयार आहे असा याचा अर्थ होतो.
    3.शॉर्ट हॉर्न तीनदा – याचा अर्थ ट्रेनच्या लोकोपायलटचं इंजिनवरील नियंत्रण सुटलं आहे. आता ट्रेनला गार्डलाच व्हॅक्यूम ब्रेकने थांबवावी लागेल.
    4. शॉर्ट हॉर्न चार वेळा – याचा अर्थ ट्रेनमध्ये तांत्रिक बघाड निर्माण झाला आहे. आता ट्रेन जागेवरून हलणार नाही.
    5. शॉर्ट हॉर्न सहा वेळा – लोकोपायलटला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा तो अशाप्रकारे 6 वेळा शॉर्ट हॉर्न वाजवतो.
    6. 2 छोटे आणि 1 मोठा हॉर्न – असा हॉर्न दोन कारणांसाठी वाजवला जातो. एखाद्याने ट्रेनची चेन खेचली किंवा गार्डने व्हॅक्यूम प्रेशर ब्रेक लावला असा होतो.
    7. अतिशय दीर्घ हॉर्न – ट्रेनमधून फार दीर्घकाळ हॉर्न ऐकू येत असेल तर ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबणार नाही असा अर्थ होतो.
    8. 2 वेळा थांबून थांबून वाजवलेला हॉर्न – जेव्हा ट्रेन रेल्वे क्रॉसिंग जवळ जाते तेव्हा असा हॉर्न वाजवते. कोणत्याही व्यक्तीने रेल्वे ट्रॅक जवळ येऊ नये असं सूचित करण्यासाठी याचा वापर होतो.
    9. दोन लांब आणि एक छोटा हॉर्न – ट्रेनने ट्रॅक बदलल्यानंतर असा हॉर्न वाजवला जातो.
    10. दोन लांब आणि दोन छोटे हॉर्न – गार्डने रेल्वे इंजिनजवळ यावं असं सांगण्यासाठी हा हॉर्न असतो.
    11. एक लांब आणि एक छोटा हॉर्न – या हॉर्ननंतर गार्ड ब्रेक सोडतो आणि मेन लाइन ट्रेन जाण्यासाठी रिकामी आहे हे निश्चित करतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT