न्यूयॉर्क : अंतराळाच्या अफाट पसार्यात कोणकोणती रहस्ये दडली आहे हे सांगता येत नाही. एरव्ही असे दिसत असते की एखाद्या तार्याभोवती ग्रह फिरत असतात. मात्र, काही ग्रह असेही आहेत ज्यांना कोणताच तारा नाही व हे ग्रह एकटेच प्रदक्षिणा घालत असतात!
आपल्या ग्रहमालिकेत पृथ्वीसह अन्य ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. चंद्रासारखे नैसर्गिक उपग्रह आपल्या ग्रहांभोवती फिरत असतात. मात्र, अंतराळात काही ग्रह असेही आहेत ज्यांना कोणताही तारा नाही की स्वतःचा चंद्रही नाही. या एकाकी ग्रहांना 'रॉग प्लॅनेट' असे म्हटले जाते. आपली ग्रहमालिका ज्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेत आहे तिथेही असे एकटे ग्रह आहेत. एखाद्या ग्रहाची निर्मिती ही तार्याजवळील धूळ व वायूंमुळे होत असते. मात्र, असे 'रॉग प्लॅनेट' अवकाशीय घटकांपासून आपोआपच निर्माण होत असतात. खगोलशास्त्रज्ञ अशा 'रॉग' ग्रहांबाबत अधिक संशोधन करीत आहेत.