Richest cities in the country | देशातील सर्वात श्रीमंत शहरे 
विश्वसंचार

Richest cities in the country | देशातील सर्वात श्रीमंत शहरे

पुढारी वृत्तसेवा

डिसेंबर 2025 मध्ये भारत जपानला मागे टाकत 4.18 ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह (सकल घरेलू उत्पादन) जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. हा गौरव भारताने केवळ दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांच्या जोरावर मिळवलेला नाही. फक्त मुंबई आणि दिल्लीच नव्हे, तर अशी अनेक शहरे आहेत जी अब्जावधी-कोट्यवधींची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. चला, आज आम्ही तुम्हाला देशातील 10 सर्वात श्रीमंत शहरांबद्दल सांगतो. या 10 शहरांचे उत्पन्न आणि जीडीपी जाणून तुम्ही थक्क व्हाल....

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. येथील अर्थव्यवस्था सुमारे 27 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. येथे भारतीय रिझर्व्ह बँक, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आहे. याशिवाय मोठ्या बँका, विमा कंपन्या आणि कॉर्पोरेट कार्यालये आहेत. येथे मोठी बंदरे आणि फिल्म इंडस्ट्रीदेखील आहे. याच कारणांमुळे मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते.

दिल्ली एनसीआर : दिल्ली एनसीआरबद्दल बोलायचे झाले, तर येथील इकॉनॉमी 26 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्ली एनसीआरमध्ये वेगाने वाढणारे रिअल इस्टेट क्षेत्र आहे. याशिवाय येथे सरकारी आणि व्यावसायिक ताकद आहे. येथे केंद्र सरकारची कार्यालये, राष्ट्रपती भवन आणि देशाची संसद देखील आहे. दिल्लीच्या दोन्ही बाजूंना नोएडा आणि गुरुग्रामसारखे मोठे आयटी आणि कॉर्पोरेट हब बनले आहेत. दिल्ली एनसीआर श्रीमंतीच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर येते.

कोलकाता : कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे आणि याची जीडीपी सुमारे 13.45 लाख कोटी रुपये आहे. बंदरासोबतच स्टील, चहाचा व्यापार, इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग या शहराच्या इकॉनॉमीचा कणा राहिले आहेत.

बंगळूर : बंगळूर शहर आपल्या आयटी एक्सपोर्टसाठी ओळखले जाते. याशिवाय येथे स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी कंपन्यादेखील आहेत. बंगळूरला भारताचे ‘सिलिकॉन व्हॅली’देखील म्हटले जाते.

चेन्नई : चेन्नई शहराची ताकद त्याचे सर्व्हिस सेक्टर आणि ऑटोमोबाईल आहे. चेन्नईच्या इकॉनॉमीबद्दल बोलायचे झाले, तर ती सुमारे 7 लाख कोटी रुपयांची आहे. चेन्नईला भारताची ‘ऑटो कॅपिटल’देखील म्हटले जाते. येथे अनेक कार आणि ऑटो पार्टस् कंपन्यांचे प्लांट आहेत. इतकेच नाही तर चेन्नईमध्ये आयटी आणि हेल्थकेअर सेक्टरदेखील मजबूत आहे.

हैदराबाद : भारताच्या श्रीमंत शहरांच्या यादीत हैदराबाद सहाव्या स्थानावर येते. याची जीडीपी सुमारे 6.70 लाख कोटी रुपये आहे. येथील बायोटेक उद्योग देखील हैदराबादच्या जीडीपीमध्ये मोठी भूमिका बजावतो.

पुणे : पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. पुण्याच्या इकॉनॉमीबद्दल बोलायचे झाले, तर ती सुमारे 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे शहर ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि आयटी कंपन्यांसह शैक्षणिक संस्थांसाठी ओळखले जाते.

अहमदाबाद : अहमदाबाद हे गुजरातचे सर्वात मोठे शहर आहे, जे साबरमती नदीच्या काठी वसलेले आहे. याची इकॉनॉमी सुमारे 6 लाख कोटी रुपये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत हे 8 व्या स्थानावर येते. हे शहर आपल्या उदयास येणार्‍या स्टार्टअप्स, केमिकल सेक्टर आणि टेक्सटाईल उद्योगासाठी ओळखले जाते आणि हे उद्योग याला आर्थिकद़ृष्ट्या मजबूत करण्याचे काम करतात.

सुरत : सुरतला टेक्सटाईल आणि हिर्‍यांचे ग्लोबल हब म्हटले जाते. सुरतची इकॉनॉमी सुमारे 5.3 लाख कोटी रुपये आहे. सुरत जगातील सर्वात मोठ्या डायमंड कटिंग आणि पॉलिशिंग केंद्रांपैकी एक आहे.

विशाखापट्टणम : विशाखापट्टणम हे भारताच्या पूर्व घाटावरील एक प्रगत शहर आहे. भारताच्या सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत विशाखापट्टनम दहाव्या स्थानावर येते. हे शहर आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे आणि प्रमुख बंदर शहर आहे. येथील आर्थिक स्थितीत पॉवर सेक्टर, स्टील प्लांट आणि शिपिंगची मोठी भूमिका आहे. येथील इकॉनॉमी सुमारे 3.9 लाख कोटी रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT