विश्वसंचार

त्राटक : सूर्याकडे तासभर एकटक पाहण्याचा अनोखा विक्रम

निलेश पोतदार

नवी दिल्ली : आपल्याकडे योगमार्गात 'त्राटक' ही एक पद्धत आहे. त्यामध्ये एखाद्या एकाच वस्तूवर एकटक पाहिले जात असते. एखादा बिंदू, ज्योत किंवा अगदी सूर्य व चंद्र त्राटकही केले जाते. अर्थातच हे सर्व प्रकार तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालीच करावे लागतात, नाही तर लाभापेक्षा हानीच होण्याचा संभव अधिक असतो.

सूर्यावर नजर खिळवणे हे सहजसोपे नाही. त्यामुळे द़ृष्टी गमावण्याचाही धोका असतो. सूर्याकडे पाच सेकंद पाहणेही आपल्याला शक्य होणार नाही. मात्र, एका वयोवृद्ध व्यक्तीने सूर्याकडे चक्क तासभर टक लावून पाहण्याचा विक्रम केला आहे!

70 वर्षांचे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी एम.एस. वर्मा यांनी चष्मा न लावता तासभर सूर्याकडे पाहण्याचा हा विक्रम केला. या काळात त्यांनी एकदाही पापण्या फडकावल्या नाहीत हे विशेष! उत्तर प्रदेशातील या वयोवद्ध व्यक्तीचा विक्रम थक्क करणाराच आहे.डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांनी हा विक्रम केला आणि त्यांच्या नावाची नोंद इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदवण्यात आली.

त्यांचा एका विक्रम त्यांच्या 25 वर्षांपासूनच्या सरावाची फलश्रुती आहे. त्यासाठी त्यांना एका गुरूचे मार्गदर्शन मिळाले होते. डॉक्टर आणि इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधींसमोर ते थेट सूर्यावर नजर भिडवू बसले आणि एक तास सूर्याकडे टक लावून पाहत राहिले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे डोळे पूर्ण निरोगी असून त्यांच्या डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. यापूर्वी एका व्यक्तीने डोळे न मिटता दहा मिनिटे सूर्याकडे पाहण्याचा विक्रम केला होता. मात्र, आता वर्मा यांनी त्यापेक्षा बराच मोठा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आपल्या विक्रमाची गिनिज बुकमध्येही नोंद व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT