विश्वसंचार

सर्वात महागडा आंबा… 2 लाख रुपये किलो!

Shambhuraj Pachindre

छत्तीसगड : फळाची कोणतीही चर्चा फळाचा राजा मानल्या जाणार्‍या आंब्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. सूरजपूर जिल्ह्यातील राजेंद्र गुप्ता यांनी आपल्या बागेत विकसित केलेल्या एका आंब्याला जागतिक बाजारपेठेत प्रतिकिलो 2 लाख रुपये दर मिळवून दिला असून सर्वसामान्यांसाठी हे दर अगदी आवाक्याबाहेरचे ठरत आहेत.

कोल फिल्डमधील रिटायर जनरल राजेंद्र गुप्ता यांनी निवृत्तीनंतर मोठ्या शहरात राहण्याऐवजी गावाकडे येत शेती करण्याचा निर्णय घेतला. कोळसा उत्पादनात कारकीर्द घडवली असल्याने झाडे तोडणे त्यांच्यासाठी कठीण होते. त्यामुळे त्यांनी दुर्मीळ, विदेशी आंब्याची बाग लावली. 2017 मध्ये त्यांनी हा प्रयोग सुरू केला. प्रारंभी, जपानमधील मियाजाकी आंब्याची रोपे लावली आणि हा प्रयोग यशस्वी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 1 लाख 80 हजार रुपयांच्या आसपास आहे. हा आंबा अतिशय महाग असल्याने तो खाण्यासाठी कमी व भेट देण्यासाठीच अधिक खरेदी केला जातो, असे सांगितले गेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT