विश्वसंचार

पेशीतून कात्रीसारखे कापून वेगळा करता येणार ‘एचआयव्ही’ विषाणू!

Arun Patil

लंडनः आधुनिक काळातील काही असाध्य विकारांमध्ये एचआयव्ही-एडस्चा समावेश होतो. त्यावर उपाय शोधण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या पेशींमधून एचआयव्ही विषाणू दूर करण्यात यश मिळाले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

नोबेल पुरस्कार विजेत्या क्रिस्पर जीन- एडिटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून हे यश मिळवल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वरवर पाहता हे तंत्रज्ञान कात्रीसारखे काम करते, पण सूक्ष्म पातळीवर विचार करता हे डीएनएला कापून त्यातून संक्रमित खराब भाग काढून टाकतं किंवा निष्क्रिय करतं. त्यामुळं शरिरातून एचआयव्हीचे विषाणू पूर्णपणे नष्ट करता येतील, अशी आशा निर्माण झाली आहे. तरीही हे तंत्रज्ञान किंवा उपचार पद्धती परिणामकारक आणि सुरक्षित आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी खूप चाचण्या आणि काम करावे लागणार आहे.

एचआयव्हीसाठीच्या सध्याच्या औषधांद्वारे विषाणूला रोखण्यात यश मिळते, पण त्याद्वारे विषाणू शरीरातून नष्ट करणे शक्य नाही. युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅमस्टरडॅमच्या एका टीमने नुकत्याच झालेल्या वैद्यकीय परिषदेत एक शोधनिबंध सादर केला. त्यात त्यांनी सुरुवातीच्या निष्कर्षांची माहिती दिली. त्यांनी केलेले काम सध्या केवळ एका संकल्पनेपुरते मर्यादीत आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच नजीकच्या काळात लगेच एचआ उपचार सापडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले नॉटिंघम विद्यापीठातील स्टेम सेल आणि जीन थेरपी टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. जेम्स डिक्सन यांनी या निष्कर्षांची अजूनही पूर्णपणे तपासणी गरजेची असल्याचे म्हटले आहे.

'भविष्यातील उपचारांचा विचार करता संपूर्ण शरिरातील या पेशींच्या कृती किंवा सक्रियतेचे परीक्षण करणे गरजेचे आहे,' असेही त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, 'एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांच्या जीवनावर परिणाम होण्यासाठी आधी यावर मोठ्या प्रमाणावर अभ्यास होणं गरजेचं आहे.' इतर शास्त्रज्ञही एचआयव्हीच्या विरोधात क्रिस्परचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लंडनच्या फ-ान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटमधील विषाणू तज्ज्ञ डॉ. जोनाथन स्टोय यांच्या मते, शरीरातील सगळ्या पेशींमधून एचआयव्ही हटवणं 'प्रचंड आव्हानात्मक' आहे. 'या उपचार पद्धतीमुळं उद्दिष्टाच्या व्यतिरिक्त होणारे परिणाम आणि दीर्घकालीन साईड इफेक्टस्ची शक्यता हा यातील चिंतेचा विषय आहे,' असेही ते म्हणाले.

'त्यामुळे क्रिस्परवर आधारित असलेली कोणतीही उपचार पद्धती अत्यंत प्रभावी आहे एं मान्य केले, तरी तिचा नियमित वापर सुरू होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागेल.'एचआयव्हीचा विषाणू रोग प्रतिकार प्रणालीच्या स्वतःसारख्याच पेशी तयार करण्याच्या यंत्रणेवरच हल्ला करतो आणि त्या पेशींना संक्रमित करतो. तरीही प्रभावी उपचारांचा वापर करून काही रुग्ण हे सामान्यपणे जगत असतात. कारण त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा डीएनए किंवा अनुवांशिक तत्त्वे असले तरी औषधांमुळे सक्रियपणे नव्या विषाणूची निर्मिती मात्र होत नसते.एचआयव्हीची लागण झालेल्या बहुतांश लोकांना आयुष्यभर अँटिरेट्रोव्हायरल थेरपी घेण्याची गरज असते. त्यांनी ही औषधे घेणं बंद केले तर हा विषाणू पुन्हा सक्रिय होऊन जास्त समस्या निर्माण करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT