Termites Destroy Cash | तिजोरीतील २९ लाख रुपये वाळवीने केले फस्‍त 
विश्वसंचार

Termites Destroy Cash | तिजोरीतील २९ लाख रुपये वाळवीने केले फस्‍त

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक : थायलंडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने मालमत्ता खरेदी करण्यासाठी आपल्या घरच्या तिजोरीत ठेवलेले तब्बल २९ लाख रुपये (सुमारे १ दशलक्ष थाई बाहत) वाळवीने पूर्णपणे खाऊन नष्ट केले आहेत. अवघ्या एका आठवड्यात नोटांचे बंडल कागदाच्या पावडरमध्ये आणि भुग्यात रूपांतरित झाले, त्‍यामुळे या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महिनाभरापूर्वीच हे पैसे तिजोरीत ठेवले होते. तिजोरी नियमितपणे उघडली आणि बंद केली जात होती, तरीही वाळवी आत कशी घुसली हे एक गूढ बनले आहे. वाळवीने नोटांचे बंडल आतून पूर्णपणे पोकळ केले होते. वरचा थर काही प्रमाणात शिल्लक दिसत असला तरी आतील सर्व पैसे मातीमोल झाले होते.

बँकेने बदलून देण्यास केला नकार

या घटनेनंतर जेव्हा कुटुंब बँकेत पोहोचले, तेव्हा अधिकाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या नोटांवर कोणताही परतावा अथवा नोटा बदलून देण्यास स्पष्ट नकार दिला. थायलंडच्या मध्यवर्ती बँकेच्या नियमांनुसार, नोटांची ओळख आणि त्यांचा सिरीयल नंबर स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. मात्र, इथे नोटांचा थेट भुगा झाला होता. यामुळे हे कुटुंब सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.

वाळवीपासून कसा कराल बचाव?

थायलंड आणि भारतासारख्या उष्ण व दमट हवामानाच्या देशांमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव खूप वेगाने होतो. नोटा कागदापासून बनवलेल्या असल्याने वाळवी सहजपणे त्यांना लक्ष्य करते. तज्ज्ञांच्या मते, नोटा नेहमी ‘एयरटाईट' प्लास्टिक कंटेनर किंवा झिप-लॉक बॅगमध्ये ठेवाव्यात. तिजोरीत ओलावा राहू नये म्हणून ‘सिलिका जेल’ची पाकिटे ठेवावीत. घरात जास्त नकद (कॅश) ठेवण्याऐवजी डिजिटल व्यवहार किंवा बँक लॉकरचा वापर करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT