एआय शोधतेय प्राण्यांची भाषा Jenny Splitter
विश्वसंचार

Animal Language : एआय शोधतेय प्राण्यांची भाषा

निसर्गाचे सर्वात मोठे रहस्य उलगडणार?

पुढारी वृत्तसेवा

केपटाऊन : मानवाला नेहमीच प्राण्यांच्या जगाविषयी आणि त्यांच्या संवादाविषयी उत्सुकता राहिली आहे. आपण अनेकदा विचार करतो की, काश! आपल्याला प्राण्यांची भाषा समजली असती. आता विज्ञानाने या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, रेकॉर्डिंग साधने आणि 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' च्या मदतीने शास्त्रज्ञ आता प्राण्यांचे छुपे आवाज डीकोड करत असून, लवकर ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या ‘कारू’ वाळवंटात फ्रान्सच्या सेंट-इटिन विद्यापीठाचे प्राध्यापक निकोलस मॅथव्हॉन यांच्या नेतृत्वाखाली 'आफ्रिकन स्ट्राईप्ड' उंदरांवर एक महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आले. शास्त्रज्ञांनी १२ दिवस आणि रात्रींमध्ये २३ मायक्रोफोन्सच्या साहाय्याने या उंदरांचे तब्बल १,२२,६१९ ओरडण्याचे आवाज रेकॉर्ड केले. या अभ्यासासाठी त्यांनी ‘चॅटजीपीटी’ सारख्या मोठ्या भाषा मॉडेल्सवर आधारित कृत्रिम न्यूरल नेटवर्कचा वापर केला. यातून धक्कादायक माहिती समोर आली की, प्रत्येक उंदराच्या घरट्याची एक वेगळी 'व्होकल सिग्नेचर' (आवाज ओळख) असते, ज्यावरून ते एकमेकांना ओळखतात. शेजारच्या उंदराचा आवाज आल्यास ते सतर्क होतात, तर अनोळखी उंदराचा आवाज आल्यास घाबरून पळून जातात.

चिम्पांझी आणि पक्षांच्या भाषेतही 'व्याकरण'

केवळ उंदीरच नाही, तर चिम्पांझी, बोनोबोस आणि झेब्रा फिंच (पक्षी) यांच्यावरही संशोधन सुरू आहे. आयव्हरी कोस्टमध्ये चिम्पांझींचा अभ्यास करणाऱ्या कॅथरीन क्रॉकफोर्ड यांनी सांगितले की, चिम्पांझी त्यांच्या १२ वेगवेगळ्या आवाजांचे विविध प्रकारे संयोजन करून नवीन अर्थ तयार करतात. माणसाच्या व्याकरणासारखीच ही पद्धत आहे. उदाहरणार्थ, विश्रांती घेतानाचा आवाज आणि स्वागताचा आवाज एकत्र करून ते ‘चला घरटे बनवूया’ असा संदेश एकमेकांना देतात.

‘डुलिटल पुरस्कार’ आणि भविष्यातील आव्हाने

प्राण्यांच्या या संवादाचा शोध घेणाऱ्या संशोधनांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिश अब्जाधीश जेरेमी कॉलर यांच्याकडून ‘डुलिटल प्राईझ’ दिला जातो. या अंतर्गत विजेत्याला १,००,००० डॉलरचे बक्षीस दिले जाते. तसेच जर एखाद्या संघाने प्राण्यांशी यशस्वी द्विमार्गी संवाद साधून दाखवला, तर त्यांना तब्बल १० दिल्लायन डॉलर्सची गुंतवणूक किंवा ५ लाख डॉलर्स रोख बक्षीस मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT