विश्वसंचार

वडाच्या झाडात चहाचे दुकान!

Arun Patil

अमृतसर : आपल्या देशात चहाची टपरी दिसणे ही काही नवलाईची बाब नाही. लोकांची चहाची तल्लफ भागवण्यासाठी अनेक ठिकाणी अशा टपर्‍या, दुकाने असतातच. मात्र, पंजाबमध्ये अमृतसर येथील चहाचे एक दुकान अनोखेच आहे. हे दुकान चक्क वडाच्या झाडाच्या बुंध्यात आहे. वडाच्या पारंब्यांनी जमिनीत रुजून जे छत बनवलेले आहे त्या खाली 80 वर्षांचे एक आजोबा हे चहाचे दुकान चालवतात.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या अनोख्या दुकानाची छायाचित्रे सोशल मीडियात शेअर केली आहेत. त्यांनी या चहाच्या दुकानाचे नामकरण 'चहा सेवेचे मंदिर' असेही केले. गेल्या चाळीस वर्षांपेक्षाही अधिक काळापासून याठिकाणी हे चहाचे दुकान आहे. महिंद्रा यांनी 23 जुलैला याबाबतची ट्विटरवर पोस्ट केली होती आणि आतापर्यंत 3 लाख 78 हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज या पोस्टला मिळालेले असून बारा हजारांपेक्षाही अधिक लाईक्सही मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी या अनोख्या दुकानावर व वयोवृद्ध दुकानदारांबाबत प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

SCROLL FOR NEXT