टेलर स्विफ्ट बनली सर्वात श्रीमंत गायिका Pudhari Photo
विश्वसंचार

टेलर स्विफ्ट बनली सर्वात श्रीमंत गायिका

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिका रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट ही जगातील सर्वात श्रीमंत गायिका बनली आहे. फोर्ब्जच्या यादीनुसार या आठवड्यात टेलर स्विफ्टची संपत्ती 1.6 अब्ज डॉलर झालेली आहे. या आधी रिहानाकडे हा मान होता. फोर्ब्जच्या यादीत रिहाना आता 1.4 अब्ज डॉलर संपत्तीमुळे दुसर्‍या क्रमांकावर आली आहे. 34 वर्षीय टेलर स्विफ्ट ही अलीकडे अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेन्ट कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी गेल्याने चर्चेत आली होती. टेलर स्विफ्ट हिच्या गेल्यावर्षीच्या वर्ल्ड वाईट टुर ‘इरास’ मुळे जगातील सर्वात श्रीमंत म्युझिशियन होण्याचा मान तिला मिळाला आहे. पोसस्टार डाटानुसार या एका टुरमुळे 2023 मध्ये स्विफ्टला 1 अब्ज डॉलरची कमाई झाल्याचे म्हटले जाते. आठ महिन्यांत 60 शो केल्याने ही कमाई झालेली आहे. या टुरने यंदाही पुन्हा 1 अब्ज डॉलरची कमाई तिला होणार असल्याचे म्हटले जात आहे.

ऑक्टोबर 2023 च्या एका टुरने अमेरिकन पॉप गायिका स्विफ्टला जगातला सर्वात श्रीमंत महिला कलाकार घडविण्याचा चमत्कार घडला. जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्विफ्ट 2,117 व्या स्थानावर आहे. स्विफ्ट हीने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केलेली आहे. रियल इस्टेटमध्ये 125 दशलक्ष डॉलरची तिची गुंतवणूक आहे. टुर व्यतिरिक्त टेलर स्विफ्टचे अनेक म्युझिक अल्बम आहेत, ज्यामध्ये 11 स्टुडिओ अल्बम आहेत आणि तिच्या पूर्वीच्या गाण्यांची “टेलर व्हर्जन” पुन्हा बाजारात आली आहे. तिच्या वाढत्या संपत्तीमध्ये या अल्बमचे देखील खूप योगदान दिले आहे. तिच्या कॅटलॉगची किंमत आता अंदाजे 600 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, असे फोर्ब्सने म्हटले आहे.

टेलर एलिसन स्विफ्ट हिचा जन्म 13 डिसेंबर, 1989 चा आहे. एक अमेरिकन गायिका आणि गीतकार असलेल्या टेलर स्विफ्टचा मोठा चाहता वर्ग आहे. स्विफ्टने 2005 मध्ये बिग मशिन रिकॉर्डस् सोबत करार केला होता. त्यानंतर टेलर स्विफ्ट (2006)आणि फियरलेस (2008) असे तिचे म्युझिक अल्बम बाजारात आले होते. यामुळे एक पॉप गायिका म्हणून ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर सोलो अल्बम ‘टियरड्रॉप्स ऑन माई गिटार’, ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘यू बिलॉन्ग विद मी’ या अल्बमला प्रचंड लोकप्रियता मिळाली. स्पीक नाऊ (2010) मध्ये रॉक एण्ड रेड (2012) मध्ये इलेक्ट्रॉनिकसोबत प्रयोग केले. बिलबोर्ड हॉट 100 नंबर-वन सोलो अल्बम तसेच ‘नेव्हर एवर गेटिंग बैक टुगेदर’, ‘शेक इट ऑफ’, ‘ब्लैंक स्पेस’, ‘बैड ब्लड’, आणि ‘लुक व्हाट यू मेड मी’ देखील गाजले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT