Sunita will communicate tonight
अंतराळवीर सुनीता विल्यम्स Pudhari File Photo
विश्वसंचार

सुनीता आज रात्री साधणार संवाद

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर हे सध्या परतीचा प्रवास लांबतच असल्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच अडकून पडले आहेत. अर्थातच, ते तिथे सुरक्षित आहेत आणि तेथील अंतराळवीर स्थानकावर सहा-सहा महिनेही राहत असल्याने सुनीता किंवा विल्मोर यांना तिथे काही राहण्यात काही अडचण आहे, असे नाही. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार त्यांना परत येता येत नाही इतकेच! याचे कारण म्हणजे बोईंग स्टारलाईनमधील तांत्रिक बिघाड. या यानामधील बिघाडांमुळे स्थानकाकडे जात असतानाही अनेक वेळा मोहीम पुढे ढकलली जात होती. आता हे यान स्थानकावर पोहचल्यावर परतीच्या प्रवासाबाबतही असेच घडत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री 8.30 वाजता सुनीता विल्यम्स फोन कॉल करून आपले संबोधन देणार असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे.

ती थेट स्पेस स्टेशनवरून या मोहिमेविषयी संवाद

सुनीता आणि विल्मोर 5 जूनला अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. तिथे त्यांचे नियोजित वेळापत्रक सात दिवसांचेच होते. सात दिवसांनंतर दोघेही पुन्हा पृथ्वीवर परत येणार होते. मात्र, बोईंग स्टारलाईनरमधील अडचणीमुळे ते एक महिना होऊनही अद्याप अंतराळातच अडकले आहेत. दरम्यान, जगालाच आता सुनीताच्या सुखरूप परतण्याविषयीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘नासा’ने ही महत्त्वाची अपडेट दिली आहे. ‘नासा’च्या निवेदनात म्हटले आहे की, सुनीता अंतराळ स्थानकावर सुरक्षित असून, ती बुधवारी (दि. 10) रात्री साडेआठ वाजता पृथ्वीला संबोधित करणार आहे. त्यावेळी ती थेट स्पेस स्टेशनवरून या मोहिमेविषयी संवाद साधणार आहे. आता तिच्या या कॉलकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

SCROLL FOR NEXT