File Photo
विश्वसंचार

सुदान ठरला जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : भ्रष्टाचाराची समस्या जगात अनेक देशांमध्ये पाहायला मिळते. जगात कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार आढळतो, याबाबतची यादीही दरवर्षी प्रसिद्ध होत असते. नुकतेच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स (सीपीआय) 2024 ची क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार सुदान हा जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश ठरला आहे! डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार आढळतो, असेही दिसून आले आहे.

भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात जगातील सर्वात भ्रष्ट आणि सर्वात इमानदार देशांची क्रमवारी जारी करण्यात येते. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीच्या आधारे सीपीआय 180 देशांची क्रमवारी सादर करते.देशांना 0 ते 100 या दरम्यान गुण दिले जातात. ज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा देश हा इमानदार देश असतो तर सर्वात कमी गुण मिळवणारा देश हा भ्रष्ट देश जाहीर केला जातो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पाकिस्तानसहित भारताच्या काही देशांनी भ्रष्टाचारामध्ये आघाडी मिळवली आहे, तर भारताचे नेमके स्थान कोणते आहे, हे जाणून घेऊया. सीपीआय रिपोर्टनुसार, भ्रष्टाचाराचा स्तर हा चिंताजनक आहे. रिपोर्टमध्ये जगातील गंभीर भ्रष्टाचार समोर आले आहेत. दोन तृतीयांश देशांना 50 हून कमी गुण मिळाले आहेत. या देशांत जगातील 6.8 अब्ज लोक राहतात. जे जगाच्या लोकसंख्येच्या 85 टक्के आहेत. जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश आहे सुदान. या देशाला केवळ 8 गुण मिळाले आहेत. या यादीत 180 वा क्रमांक मिळालेला हा देश आहे. त्यानंतर सोमालिया 179 क्रमांक, व्हेनेझुएला 178 क्रमांक, सीरिया 177 क्रमांकांवर आहेत.

सर्वात कमी भ्रष्टाचार ज्या देशात होतो, अशा देशांमध्ये डेन्मार्कने सलग 7 व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. सीपीआय प्रमाणे 90 गुण प्राप्त केले आहेत. दुसर्‍या क्रमांकावर फिनलँड (88) तिसर्‍या क्रमांकावर सिंगापूर (84) चौथ्या क्रमांकावर न्युझीलंड (83), 81 गुणांसहित लग्जमबर्ग, नॉर्वे स्वित्झर्लंड संयुक्तरीत्या पाचव्या स्थानावर आहे. भारत या यादीत 96 क्रमांकावर आहे. भारताला 38 गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या यादीत भारत हा 93 व्या क्रमांकावर होता. त्यामुळे 3 क्रमांकाने घसरण झाली आहे. आपल्या शेजारी देशांच्या यादीतील स्थानांचा विचार केल्यास पाकिस्तान 27 गुणांसहित थेट 135 क्रमांकावर आहे. चीन 42 गुणांसहित 76 व्या क्रमांकावर आहे; तर वरील यादीनुसार बांगला देश 23 गुणांसहित 151 व्या स्थानावर आहे; तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान अनुक्रमे 121 आणि 165 व्या स्थानावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT