अनेक गंभीर आजारांना दूर ठेवते स्ट्रॉबेरी Pudhari File Photo
विश्वसंचार

अनेक गंभीर आजारांना दूर ठेवते स्ट्रॉबेरी

आरोग्यासाठीही स्ट्रॉबेरी फायद्याची ठरते

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आपल्याकडे कुणी महाबळेश्वरला गेलंय आणि त्याने स्ट्रॉबेरी खाल्ली नाही, असे सहसा होत नाही. खरे तर हिवाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते स्ट्रॉबेरीचे. स्ट्रॉबेरी ही फक्त दिसायला आणि चवीलाच सुंदर नाहीये. स्ट्रॉबेरीजमध्ये भरपूर पोषक तत्त्वे आढळतात, ज्यामुळे जिभेचे चोचले तर पुरवलेच जातातच. मात्र, त्यासोबतच आरोग्यासाठीही स्ट्रॉबेरी फायद्याची ठरते. आहारतज्ज्ञांच्या मते स्ट्रॉबेरी खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता येतं.

स्ट्रॉबेरी दिसायला लालचुटूक आणि चवीला आंबटगोड असते. त्यामुळे अनेकांना ती आवडते. स्ट्रॉबेरीजचा वापर जसा खाण्यासाठी होतो तसाच तो सजावटीसाठी सुद्धा होतो. ज्यूस, मिल्कशेक, डेझर्ट, दही, ओटस् याशिवाय आईस्क्रिम सारख्या इतरही अनेक अनेक गोष्टींवर टॉपिंग्स म्हणून स्ट्रॉबेरीचा वापर होतो. स्ट्रॉबेरीत असलेल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखं राहून भूक कमी लागते. स्ट्रॉबेरी हे फॅट फ्री आणि कमी कॅलरीयुक्त फळ आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर स्ट्रॉबेरी खाणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. स्ट्रॉबेरीजमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ उत्तम प्रमाणात आढळून येतं. यामुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात स्ट्रॉबेरीज खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. स्ट्रॉबेरीमध्ये विविध जीवनसत्त्वे, मँगनीज, पोटॅशियम, फायबर्स आणि पॉलिफेनॉलसारखे उत्तम अँटिऑक्सिडंट्स असतात. स्ट्रॉबेरीज या सोडियम फ्री, फॅट फ्री, कोलेस्ट्रॉल फ्री असतात. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंटस् ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करतात. स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित व्हायला मदत होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी या हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याच्या मानल्या जातात. स्ट्रॉबेरीचा ग्यायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. त्यामुळे रक्तात साखर उशीरा सोडली जाते. याशिवाय स्ट्रॉबेरीत असलेल्या फायबर्समुळे अन्न लवकर पचतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहायला मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT