सुनीता विल्यम्सच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमधून विचित्र आवाज ऐकू आला. Pudhari File Photo
विश्वसंचार

सुनीताच्या यानातून येत आहेत विचित्र आवाज

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार्‍या बोईंग स्टारलायनर यानाने सुरुवातीपासूनच अडचणी आणल्या होत्या. या दोघांना घेऊन जाण्यासाठीची मोहीमही यानामधील समस्यांमुळे अनेक वेळा लांबली होती. एकदाचे दोघे यानातून ‘आयएसएस’वर पोहोचल्यावर त्यांना परत आणण्यावेळीही यानामध्ये बिघाड निर्माण झाला. आता या यानातून परतीचा प्रवास करणे धोक्याचे असल्याचे स्पष्टच झाल्याने सुनीता व विल्मोर अन्य यानातूनच पृथ्वीवर परत येणार आहेत. दरम्यान, बोईंग स्टारलायनर यानातून आता विचित्र आवाज येत असल्याचे विल्मोर यांनी ऐकले आहे. हे आवाज अंतराळ यानामधील एका स्पीकरमधून येत आहेत.

यानातील नव्या आवाजाने नव्या चिंता

फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार, विल्मोर यांनी ह्युस्टनच्या मिशन कंट्रोलला म्हटले, माझ्याकडे स्टारलायनरबाबत एक प्रश्न आहे. येथील स्पीकरमधून एक विचित्र असा आवाज येत आहे. हा आवाज कशामुळे येत असावा हे मला समजत नाही. या बातचीतनंतर विल्मोर यांनी मिशन कंट्रोलला हा आवाज ऐकवला. हा एक स्पंदनशील (व्हायब्रेटाइल) आवाज होता. या आवाजाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आवाजाचे कारण शोधणे आता तुमच्यावरच आहे असे विल्मोर यांनी सांगितले. जर तुम्हाला याबाबत समजले तर आम्हाला कॉल करा, असेही त्यांनी सांगितले. याच स्टारलायनर यानामुळे सुनीता व विल्यम आठ दिवसांच्या मोहिमेवर गेले असता आठ महिन्यांपासून तिथेच अडकून पडले आहेत! आता यानातील या नव्या आवाजाने नव्या चिंतांना जन्म दिला आहे. सुनीता आणि विल्मोर एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या यानातून फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर येणार आहेत. सध्या सुनीता व विल्मोर आधीपासूनच अंतराळ स्थानकावर राहून वैज्ञानिक प्रयोग करीत असलेल्या अंतराळवीरांच्या टीमसोबत राहात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT