Healthy Drinks | ‘या’ आरोग्यदायी पेयांनी करा दिवसाची सुरुवात 
विश्वसंचार

Healthy Drinks | ‘या’ आरोग्यदायी पेयांनी करा दिवसाची सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

आजच्या काळात अनेकजण घरगुती पद्धतीने बनवलेल्या आहाराकडे अधिक लक्ष देत आहेत. घरी सहज बनवता येणारी अनेक आरोग्यदायी पेयंही आहेत, जी चव आणि पोषण यांचा उत्तम मेळ साधतात. त्यांची निवड तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार करू शकता, असे आहारतज्ज्ञ सांगतात. सकाळची सुरुवात करण्यासाठी पाच आरोग्यदायी पेयं कोणती आहेत आणि रिकाम्या पोटी कोणती पेयं पिणे टाळावीत हे जाणून घेऊया...

कोमट पाणी

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी पुन्हा भरण्यास मदत होते आणि रात्रीच्या जागरणानंतर शरीर ताजेतवाने होते. दिवसाची सुरुवात करण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे.

लिंबूपाणी

अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लास साध्या किंवा कोमट पाण्यात मिसळून प्या. चवीसाठी हवे असल्यास थोडा पुदिना यामध्ये टाका. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शरीराचे पोषण करण्यास आणि ताजेतवाने वाटण्यास मदत करते.

सत्तू पेय

एका ग्लास थंड किंवा साध्या पाण्यात २ ते ३ चमचे सत्तू, थोडे भाजलेले जिरे पूड, काळे मीठ आणि लिंबाचा रस मिक्‍स करून चांगले ढवळून घ्या. सत्तूमध्ये प्रथिने आणि फायबर असतात, जे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करतात.

नारळाचे पाणी

सकाळी ताज्या नारळाचे पाणी पिणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर इलेक्ट्रोलाईटस्‌ असतात. जे शरीराला हायड्रेटेड आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. उष्ण आणि दमट हवामानात नारळ पाणी पिणे विशेषतः फायदेशीर ठरते.

फळे आणि भाज्यांचे स्मुदी

स्मुदी बनवण्यासाठी केळे, सफरचंद, पालक आणि दही किंवा दूध एकत्र ब्लेंड करा. इच्छित असल्यास तुम्ही त्यात चिया सीडस्‌ किंवा जवसाच्या बिया मिक्स करू शकता. हे पेय जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने आणि खनिजांनी समृद्ध असल्यामुळे नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT