विश्वसंचार

हिरेजडीत दागिन्यासारखा चकाकणारा स्क्वीड

Arun Patil

वॉशिंग्टन : जगाच्या पाठीवर अनेक सुंदर जीव आढळतात. त्यामध्ये 'स्ट्रॉबेरी स्क्वीड' या सागरी जलचराचा समावेश होतो. त्याला 'एच. हेटरोस्पिस' असे वैज्ञानिक नाव आहे. हा स्क्वीड अतिशय सुंदर असतो. त्याचे शरीर जणू काही हिर्‍यांनी मढवले आहे की काय असे वाटते!

निसर्गाची किमया अप्रतिम आहे. याचा उत्तम नमुना या स्क्वीडच्या रूपात पाहायला मिळतो. या स्क्वीडचे 'हिरेजडीत' रूप पाहून सगळेच अचंबित होतात. या प्रौढ स्क्वीडचा डावा डोळा त्याच्या उजव्या डोळ्याच्या दुप्पट व्यासाचा असू शकतो. याचे डोळे निळ्या रंगाच्या गोटीप्रमाणे दिसतात. स्ट्रॉबेरी स्क्वीडच्या संपूर्ण शरीरारवर लाल, निळा, सोनेरी पिवळा आणि रूपेरी रंगांचे चमकणारे ठिपके असतात, जे हिर्‍यांसारखे दिसतात. त्याच्या शरीराचा आकार स्ट्रॉबेरीसारखा असतो. स्ट्रॉबेरी स्क्वीड समुद्रात 1,000 मीटर (3,300 फूट) खोलीपर्यंत आढळतात.

SCROLL FOR NEXT