Unique Vada Pav Story | वीस रुपयांचा वडापाव खाण्यासाठी तब्बल १५ हजार उडवले!  
विश्वसंचार

Unique Vada Pav Story | वीस रुपयांचा वडापाव खाण्यासाठी तब्बल १५ हजार उडवले!

दिल्लीतून थेट विमानाने मुंबईत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सचिन तेंडुलकरपासून ते बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींपर्यंत आणि सर्वसामान्य मुंबईकरांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. बहुतांश मुंबईकरांना आठवड्यातून एकदा तरी वडापाव खाण्याचा मोह आवरत नाही. याच वडापावची क्रेझ जगभर पसरली आहे. आता दुबईतही वडापाव मिळतो. परंतु, मुंबईच्या वडापावची चवच निराळी. अवघ्या वीस रुपयांना मिळणारा वडापाव हा गरिबाची भूक भागवतो, तर श्रीमंतांचीही रुची तृप्त होते. स्वप्ननगरी, मायानगरी असलेल्या मुंबईचा हा प्रसिद्ध वडापाव खाण्यासाठी दिल्लीतील तरुणीने चक्क १५ हजार रुपये खर्च केले. ती चक्क दिल्लीतून विमानाने खास वडापाव खाण्यासाठी मुंबईत आली!

देशाच्या राजधानीतून महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन अखेर तिने मुंबईच्या वडापावचा आस्वाद घेतला. या प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केला आहे. त्यामध्ये तिने आपला संपूर्ण अनुभव सांगितला आहे. तिने सांगितले की, दिल्लीत वडापाव खाल्ला, परंतु तिला चव खास वाटली नाही. त्यामुळे दिल्लीपेक्षा मुंबईत चविष्ट वडापाव मिळू शकतो, असे वाटले. तिने बॅग पॅक केली आणि थेट विमानाने मुंबई गाठली. तिने दिल्लीतून मुंबईला जाण्यासाठी विमानाचे तिकीट आरक्षित केले. त्यासाठी तिने ५ हजार रुपये मोजले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची वाट पाहत असताना चहा घेतला. त्यासाठी १६५ रुपये मोजले.

विमानात बसल्यावर नुडल्ससाठी ३०० रुपये खर्च केले. मुंबईत जवळपास ७ वाजता पोहोचली. सायंकाळी उशिरा पोहोचल्यानंतर तिने हॉटेलमधील एका रूममध्ये राहण्यासाठी ४ हजार रुपये मोजले. दिल्लीतील तरुणी सकाळी हॉटेलमधून बाहेर पडली. तिने ऑनलाईन पदार्थ मागवण्याऐवजी थेट रस्त्यावर पोहोचली. तिने रस्त्यावर २० रुपयांचा वडापाव खरेदी केला. सकाळचा नाश्ता म्हणत तिने वडापावचा आस्वाद घेतला. या संपूर्ण प्रवासात तिने १५ हजार रुपयांचा खर्च केला. व्हिडीओच्या शेवटी तिने सांगितले की, वडापावचा पहिला घास खाल्ला. मुंबईत सहज वडापाव उपलब्ध होतो. इतके पैसे आणि वेळ खर्च केल्यानंतर मान्य करते की, मी मुंबईत खालेल्ला आयुष्यातील सर्वात बेस्ट वडापाव होता! दिल्लीतील तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT