विश्वसंचार

पृथ्वीवर पुन्हा येणार सौरवादळ!

Arun Patil

वॉशिंग्टन : काही दिवसांपूर्वीच सौर वादळामुळे पृथ्वीवर अनेक ठिकाणी ऑरोरा म्हणजेच आकाशातील रंगीत प्रकाशझोत दिसले होते. केवळ ध्रुवीय प्रदेशातच नव्हे, तर भारतात लडाखच्या आसमंतातही ऑरोरा दिसला होता. ज्यावेळी सौरकण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकतात, त्यावेळी असा ऑरोरा दिसतो. आता पुन्हा एकदा सूर्यावर स्फोट झाले असून, त्यामुळे पृथ्वीवर आणखी एक सौरवादळ येऊ घातले आहे.

सौर वादळांमुळे पृथ्वी जणू त्रस्त झाली आहे. सूर्यावर निर्माण झालेल्या सनस्पॉटमध्ये सतत स्फोट होत आहेत आणि एकामागून एक सोलर फ्लेअर त्यातून बाहेर येत आहेत. त्यामुळे पृथ्वीवर सौर वादळांचा परिणाम दिसत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण, विशेषतः युरोपियन देशांमध्ये दिसणारे ऑरोरा आणि काही काळासाठी होणारे रेडिओ ब्लॅकआऊट आहेत. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने आणखी एक सौरवादळ येत असल्याची माहिती दिली आहे. याचा परिणाम असा होऊ शकतो की, पुन्हा एकदा पृथ्वीवर ऑरोरा दिसेल, तसेच काही काळासाठी रेडिओ ब्लॅकआऊटस्देखील होऊ शकतात. 27 मेला सनस्पॉट 'एआर3664'मधून एक सौर वादळ निघाले आहे. हे 'एक्स 2.8' क्लास प्रकारचे वादळ आहे, ज्यांना सर्वात शक्तिशाली सौरवादळ म्हटले जाते.

'नासा'नुसार सूर्यावर खूप मोठ्या स्फोटानंतर ऊर्जा, प्रकाश आणि वेगवान सौरकण अवकाशात प्रवास करत आहेत आणि पृथ्वी त्यांच्या मार्गात येत आहे. परंतु याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होणार नाही कारण पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सौर वादळांना रोखण्याचे काम करते, त्यामुळे सौरवादळ वातावरण भेदून आत येत नाहीत. सौरवादळ जास्त शक्तिशाली असल्यास आपल्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवर प्रभाव टाकू शकते. लो-अर्थ ऑर्बिटमधील सॅटेलाईटस्देखील यामुळे निकामी होऊ शकतात. सध्या सूर्य आपले सौरचक्र पूर्ण करत आहे आणि खूप सक्रिय फेजमध्ये आहे. त्यामुळे सूर्यातून सोलर फ्लेअर्स म्हणजे ज्वाला निघत आहेत आणि त्यांचा परिणाम म्हणून पृथ्वीवर सौरवादळे येत आहेत. अशी सौरवादळे 2025 पर्यंत येत राहतील, अशी अपेक्षा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT