विश्वसंचार

चंद्राच्या पृष्ठभागावरील माती अपेक्षेपेक्षा कडक

दिनेश चोरगे

नवी दिल्ली : भारताने ऑगस्टमध्ये नवा इतिहास रचला. चांद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर यामुळे भारत चंद्रावर जाणारा चौथा आणि दक्षिण ध—ुवावर उतरणारा पहिला देश बनला. चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. त्यात प्रज्ञान रोव्हर होते. या रोव्हरने पुढील प्रवासास सुरुवात केली. या रोव्हरची खासियत अशी होती की, त्याच्या मागील चाकावर अशोक स्तंभ आणि इस्त्रोचे लोगो होते. ते यासाठी बनवले गेले की, चंद्रावर ते प्रवास सुरू करेल, त्यावेळी अशोक स्तंभ व इस्रोची छबी चंद्राच्या पटलावर उमटवली जाईल. आता प्रज्ञान रोव्हर त्यात अपयशी ठरले. पण, इस्रोचे संशोधक याला उत्तम संकेत मानतात, ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती अपेक्षेपेक्षा कडक आहे आणि त्यामुळे ही छबी उमटवता आली नाही. पण, ही माती कडक असणे हे त्यांच्या मते सुचिन्ह आहे.

तसे पाहता, चंद्रावरील दक्षिण ध—ुव भविष्यातील अनेक मोहिमांचे मुख्य लक्ष्य आहे आणि शिव शक्ती पॉईंटजवळील चंद्रावरील माती अर्थात रिगोलिथ अतिशय कडक आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याबाबत बोलताना म्हटले की, अस्पष्ट छबी आणि आणखी काही निशाण्यांमुळे आम्हाला नवा शोध लागला आहे. येथील माती अगदी वेगळी आहे, याची आम्हाला यापूर्वीच कल्पना होती, पण आता आम्हाला हे कळाले आहे की, येथे वेगळेपण नेमके काय आहे.

ते पुढे म्हणाले, जेथे रोव्हर चालतो, तेथील माती धूळमिश्रित नाही. त्यामुळे त्याला कोणता तरी घटक एकसंघ ठेवत आहे, हे निश्चित आहे. पृथ्वीवर याचे लुनर सॉईल सिम्युलेटच्या माध्यमातून परीक्षण केले गेले होते. लुनर सॉईल सिम्युलेट अमेरिकेच्या अपोलो मोहिमेच्या माध्यमातून एकत्रित केले गेले होते. अपोलो मोहीम त्यावेळी चंद्राच्या भूमध्य रेषेत उतरवले गेले होते.फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक अनिल भारद्वाज यांनी रोव्हरच्या खुणा उमटत असल्याचे निरीक्षण यावेळी नोंदवले. लँडिंग साईट आणि रोव्हर मुव्हमेंट साईटच्या आसपासच्या छायाचित्रावरून असे दिसून येते की, जवळपास एक सेंटीमीटरपर्यंत त्याच्या खुणा सापडून येत आहेत आणि हे उत्तम लक्षण आहे, असेही ते म्हणतात.

SCROLL FOR NEXT