US national AI rules: अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये ‌‘एआय‌’ साठी आता एकच ‌‘राष्ट्रीय नियम‌’! File Photo
विश्वसंचार

US national AI rules: अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये ‌‘एआय‌’ साठी आता एकच ‌‘राष्ट्रीय नियम‌’!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, त्यांचे सरकार संपूर्ण देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) साठी एक ‌‘समान नियम‌’ लागू करेल

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, त्यांचे सरकार संपूर्ण देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) साठी एक ‌‘समान नियम‌’ लागू करेल. जर प्रत्येक राज्याने स्वतःचे वेगळे नियम बनवले, तर अमेरिकेचे तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्व कमी होऊ शकते, असे त्यांचे मत आहे.

सोशल मीडियावर ट्रम्प यांनी लिहिले की, जगातील एआय स्पर्धेत पुढे राहण्यासाठी अमेरिकेला एकाच राष्ट्रीय नियमपुस्तिकेची गरज आहे. जर ‌‘एआय‌’ साठी प्रत्येक राज्याने स्वतःचे नियम आणि मंजुरीची प्रक्रिया लागू केली, तर नवाचाराची गती मंदावेल. त्यांनी सांगितले की, या आठवड्यात ते ‌‘जछए ठणङए एुशर्लीींर्ळींश जीवशी‌’ जारी करतील, ज्यामुळे ‌‘एआय‌’ नियमांची प्रक्रिया सोपी आणि एकसमान होईल.

ट्रम्प म्हणाले, ‌‘तुम्ही जर एखाद्या कंपनीकडून अशी अपेक्षा करत असाल की, तिने प्रत्येक कामासाठी 50 राज्यांकडून वेगवेगळ्या मंजुऱ्या घ्याव्यात, तर ते शक्य नाही.‌’ ट्रम्प यांचा हा निर्णय अलीकडेच सुरू केलेल्या ‌‘जेनेसिस मिशन‌’ नंतर आला आहे. हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे, ज्याचे उद्दिष्ट ‌‘एआय‌’ च्या मदतीने वैज्ञानिक शोधांची गती वाढवणे आणि अमेरिकेचे तांत्रिक वर्चस्व मजबूत करणे आहे. व्हाईट हाऊसनुसार ‌‘जेनेसिस मिशन‌’ एक असा ‌‘एआय‌’ प्लॅटफॉर्म तयार करेल जो मोठ्या संघीय डेटा सेटस्‌‍चा वापर करून नवीन वैज्ञानिक मॉडेल्स आणि ‌‘एआय‌’ एजंट तयार करेल. हे एआय एजंट नवीन वैज्ञानिक सिद्धांतांची चाचणी करतील, संशोधनाचे काम जलद करतील आणि वैज्ञानिक यशांना पुढे नेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT