अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.  Pudhari Photo
विश्वसंचार

अमेरिकेतही शिवजयंती जल्लोषात!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : शिवजयंतीनिमित्त बुधवारी अवघा भारत शिवमय झाला होता; पण सातासमुद्रापारही शिवरायांचा जयघोष दुमदुमला. अमेरिकेतदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. गेल्या 12 वर्षांपासून छत्रपती फाऊंडेशनकडून न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर व भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी केली जाते. यावेळी पारंपरिक वेशभूषेत, शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत शिवभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

यावेळी न्यूजर्सी येथील 10 महिलांनी लेझीम नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलं ते रुद्र डान्स अ‍ॅकॅडमी तर्फे 22 लहान मुला-मुलींनी मिळून शिवछत्रपतींच्या शौर्यावर नृत्य सादर केले. यामध्ये लहानपणापासून शिवबांनी स्वराज्याच्या शत्रूंचा कसा सामना केला, माँसाहेब जिजाऊँच्या प्रेरणेने स्वराज्याची स्थापना कशी केली व आया-बहिणींना समानतेची वागणूक कशी दिली, याबाबतचे विविध प्रसंग साकारण्यात आले. या कार्यक्रमात न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. न्यूयॉर्क येथील छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष अपार दळवी यांनी शिवाजी महाराज यांच्या नावाने न्यूयॉर्क शहरातील रस्ता नामकरण करण्यात यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थायी स्वरूपाचे स्मारक व पुतळा न्यूयॉर्कमध्ये उभारण्यासाठी प्रस्ताव मांडला. यावेळी ीहर्ळीीं. अख ह्या अख तंत्रज्ञानाचा वापर करून छडज कंपनीतर्फे पोर्टल लाँच करण्यात आले. शिवरायांबद्दलची माहिती 300+ भाषांमध्ये, 150+ देशांमध्ये ह्या पोर्टलद्वारे पोहोचेल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT