विश्वसंचार

मेंदूवरील ऑपरेशनवेळी ‘ती’ वाजवत होती व्हायोलिन

दिनेश चोरगे

लंडन : शस्त्रक्रिया म्हटलं तरी अनेक लोक घाबरतात. अशा स्थितीत 'मेंदूवरील शस्त्रक्रिया' म्हटल्यावर रुग्ण किती घाबरून जाऊ शकतो याची आपण कल्पना करू शकतो. मात्र, अशा शस्त्रक्रियांवेळी रुग्ण सलग अनेक तास आवडते चित्रपट पाहत राहणे, सॅक्सोफोन वाजवणे, गायन करणे किंवा अन्य आवडीचा छंद जोपासणे अशी कामे करीत असतानाही अलीकडच्या काळात दिसून आलेले आहे.

यामागे एक विशिष्ट वैद्यकीय कारण असते. मेंदूवर शस्त्रक्रिया करीत असताना विशिष्ट भागालाच भूल दिलेली असते व त्या भागाशिवाय अन्य भागातील केंद्रे आपली नियमित कामे नीट करीत आहेत, त्यांना धक्का लागलेला नाही याची खात्री होण्यासाठी डॉक्टरांकडून असे करण्यास सांगितले जात असते. आता एक महिला आपल्या मेंदूवरील शस्त्रक्रियेवेळी व्हायोलिन वाजवत होती!

ऑपरेशन थिएटरमधील याबातचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रुग्ण महिला स्वत:च व्हायोलिन वाजवताना दिसून आली. तिचे धाडस पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. तिच्या मेंदूतील ब—ेन ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. सर्व उपकरणांनी सज्ज असलेलं हे थिएटर, त्यात डॉक्टर गंभीर स्वरूपात त्या वृद्ध महिलेच्या मेंदूचे ऑपरेशन करत आहेत. या महिला निर्भयपणे व्हायोलिन वाजवत होती. ऑपरेशनवेळी ही महिला व्हायोलिनच्या संगीतात पूर्णपणे तल्लीन झालेली दिसून येत होती. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या सर्जरी या 8 ते 10 तास चालतात. हा व्हिडीओ सोशल इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 92 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. यापूर्वीही गेल्यावर्षी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एका संगीतकाराच्या ब—ेन ट्यूमर सर्जरीच्या वेळी तो सॅक्सोफोन वाजत होता!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT