वॉशिंग्टन : Esquire मासिकाने 2025 साठी ‘जगातील सर्वात श्रीमंत 10 अभिनेत्यांची’ यादी नुकतीच जाहीर केली असून, भारताचा सुपरस्टार शाहरुख खान (shahrukh khan) यामध्ये चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे. ‘बॉलीवूडचा किंग’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख या यादीतील एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर अभिनेता आणि राजकीय व्यक्ती अर्नोल्ड श्वार्त्झनेगर आहे. एक अब्जाधीश अभिनेता व रिअल इस्टेट गुंतवणूकदार म्हणूनही त्याची ओळख आहे. फोर्ब्सच्या यादीतही अब्जाधीश म्हणून त्याचा समावेश आहे. दुसर्या स्थानावर ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सन आहे. त्याची संपत्ती 1.19 अब्ज डॉलर्स आहे.. Teremana Tequila ब्रँडमुळे प्रचंड आर्थिक यश त्याला मिळाले.
तिसर्या स्थानावर लोकप्रिय अभिनेता टॉम क्रूझ आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ व ‘टॉप गन’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांमुळे तो कमाईत आघाडीवर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या शाहरुखच्या दोन ब्लॉकबस्टर हिटस् ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांनी अलीकडेच मोठी कमाई केली होती. शाहरुख Red Chillies Entertainment चा मालक आहे तसेच IPL व अन्य लीगमध्ये क्रिकेट संघांचा मालकही आहे.
विविध ब्रँडस् व स्टार्टअप्समध्ये त्याची मोठी गुंतवणूक आहे. पाचव्या स्थानावर जॉर्ज क्लूनी असून त्याची 742.8 दशलक्ष डॉलर्सची निव्वळ संपत्ती आहे. Casamigos Tequila विक्रीतून त्याला अब्जावधींचा नफा झाला. याशिवाय पहिल्या दहाजणांमध्ये रॉबर्ट डाऊनी गी., जॅकी चॅन, केविन हार्ट, रॉबर्ट डी नीरो, ब्रँड पिट यांचाही समावेश आहे. (shahrukh khan)