विश्वसंचार

तब्बल सात हजार मीटर लांबीचा वधुवेश!

Arun Patil

लंडन : लग्नात सुंदर पोशाख परिधान करणे हे अनेक तरुणींचे स्वप्न असते. मात्र, अशा पोशाखांबाबत विश्वविक्रम घडतोच असे नाही. एका तरुणीच्या वधुवेशाने मात्र जागतिक विक्रम केला आणि तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्येही झाली. या वधूच्या पोशाखाची लांबी तब्बल 7 हजार मीटर होती!

सायप्रसमध्ये राहणार्‍या मारिया या तरुणीने हा सात हजार मीटर लांबीचा पोशाख घातला होता. हा जगातील सर्वात मोठा वेडिंग गाऊन आहे. हा गाऊन बनवण्यासाठी 3 लाख 18 हजार रुपयांचा खर्च आला. ग्रीसच्या एका कंपनीला हा ड्रेस बनवण्यासाठी दिला होता. त्यांना पोशाख बनवण्यासाठी तीन महिने लागले. लग्नाच्या दिवशी एका छोट्या ट्रकच्या मदतीने रोल केलेला हा ड्रेस मैदानात पसरविण्यात आला. सुमारे 6 तासांच्या प्रयत्नांसाठी तीस लोकांनी हा ड्रेस सांभाळला होता. यावेळी गिनिज बुकची टीमही उपस्थित होती.

SCROLL FOR NEXT