वॉशिंग्टन : झाडे लावणे गरजेचे आहे. ते आपल्या सर्वांच्या जगण्याइतकेच महत्त्वाचे आहे. कशाच्याही माध्यमातून झाडांच्या बियांना जमिनीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे; पण बिया अशा ठिकाणी पेरल्या पाहिजेत जिथे त्या अंकुरित होऊ शकतील, अशा ठिकाणी नाही जिथे त्यांच्यासाठी उगवणे कठीण होईल. एका अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सने बिया लावण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. काहीतरी हटके करूनही त्याचे परिणाम मिळण्याची शक्यता फार कमी आहे, याचा अंदाज यूजर्सना आला आहे.
सर्गेई वाव्हिलोव्ह यांनी हा व्हिडीओ बनवण्यासाठी आकाशाची निवड केली आहे. त्यांनी विमानातून १ दशलक्ष (१० लाख) बिया फेकल्या. या बिया थेट वाळवंटावर शेकडो फूट उंचीवरून खाली टाकण्यात आल्या. सर्गेई यांनी जशी बिया फेकण्याची अनोखी पद्धत निवडली, तशीच आकाशातून खाली उतरण्याची पद्धतही अगदी वेगळी निवडली. ते पॅराशूटच्या मदतीने वाळवंटावर उतरले. दूरवरच्या भागात बिया पोहोचवण्याची ही एक अनोखी पद्धत आहे. यामुळे पाऊस पडल्यानंतर बिया मातीत रुजतात आणि नंतर रोपे तयार होऊ लागतात.
या व्हिडीओमध्ये सर्गेई आधी विमानातून बियाफेक करताना दिसत आहेत. त्यांच्या मते, या १ दशलक्ष बिया आहेत. त्यानंतर ते पॅराशूटने खालीही उतरतात. प्रयत्न तर खूप केला आहे; पण यूजर्ससमोर एकच प्रश्न आहे की, वाळवंटात बिया रुजणार कशा? एका यूजरचे म्हणणे आहे की, वाळवंटात झाडे उगवत नाहीत, यामागे काहीतरी कारण असते. येथे ओलावा खूप कमी असतो. एका यूजरने विचारले आहे की, हे खरोखर काम करेल का? तर दुसऱ्या एका यूजरने असेही लिहिले आहे की, ‘तू १ दशलक्ष रोपे वाया घालवली आहेस!’