विश्वसंचार

Spine disorders risk | बैठी कामाने मणक्याचे आजार आणि गंभीर समस्यांचा धोका

पुढारी वृत्तसेवा

लंडन : आजचे जग कॉम्प्युटर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानावर चालत आहे. यामुळे कार्यालयात किंवा घरून काम करताना डेस्कवर सलग 8 तास किंवा त्याहून अधिक काळ बसून राहणे ही आता अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, इतका वेळ एकाच जागेवर बसून राहिल्याने आपल्या मणक्यावर काय परिणाम होतो? मानवी शरीर खरोखरच इतक्या वेळेच्या निष्क्रियतेसाठी बनले आहे का? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती सतत बसून राहते, तेव्हा तिच्या शरीराची ठेवण किंवा पोश्चर नैसर्गिकरीत्या बदलू लागतो. सुरुवातीला व्यक्ती ताठ बसू शकते; पण जसा शरीराला थकवा जाणवू लागतो, तशी बसण्याची पद्धत चुकीची आणि पाठीला बाक आणणारी होत जाते. तज्ज्ञ म्हणतात, ‘चुकीच्या पोश्चरमुळे मणक्याचा नैसर्गिक बाक बदलू लागतो. पाठीच्या खालच्या भागाचा नैसर्गिक बाक नष्ट झाल्यामुळे, मणक्यांमधील चकत्यांवर अतिप्रमाणामध्ये भार पडू लागतो. या चकत्या सहसा शरीरासाठी ‘शॉक अ‍ॅब्जॉर्बर’ (धक्के शोषून घेणारे) म्हणून काम करतात. मात्र, दीर्घकाळ दाब पडल्यामुळे या चकत्यांची झीज होऊ शकते, ज्यामुळे पाठदुखी, कडकपणा आणि स्नायूंचा थकवा वाढतो.’

मणक्याला आधार देणारे स्नायू दीर्घकाळ न वापरल्या गेल्यामुळे ते हळूहळू कमकुवत होतात. यामुळे शरीराला मिळणारा पोश्चर सपोर्ट कमी होतो. तसेच, नितंबांचे स्नायू आणि पायाच्या मागचे स्नायू कडक होतात, ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागावर ताण येतो आणि सायटिकासारख्या वेदना सुरू होऊ शकतात. कामे करताना किंवा स्क्रीनकडे पाहताना मान सतत पुढे झुकवून ठेवल्याने मानेच्या मणक्यावर आणि स्नायूंवर प्रचंड ताण येतो. यामुळे तीव्र मानदुखी आणि ‘टेन्शन हेडएक’ म्हणजेच ताणामुळे होणार्‍या डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT