विश्वसंचार

शापित जहाजामागील रहस्याचा शोध सुरूच

Arun Patil

रॉटरडॅम : रहस्यांबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडते. मात्र, जगात अशी काही रहस्ये आहेत, ज्यांचा उलगडा अजूनही झालेला नाही. असेच एक रहस्य म्हणजे शापित जहाज. फ्लाइंग डचमन असे या जहाजाचे नाव आहे. असे मानले जाते की, जवळपास गेल्या 400 वर्षांपासून हे जहाज समुद्रात भटकत आहे. जहाज अतिशय रहस्यमयी असून यासंबंधी अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. त्यातील एक म्हणजे हे जहाज पाहणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे सांगितले जाते की, समुद्रात हे जहाज कोणी पाहिले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भरपूर अडचणी येतात. अनेकांनी फ्लाइंग डचमन जहाज पाहिल्याचा दावा केला आहे. तथापि, यामध्ये किती सत्य आहे, याची पडताळणी अजून कोणीही केलेली नाही.

प्रसिद्ध लेखक निकोलस मॉन्सेरेट यांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान प्रशांत महासागरात हे शापित जहाज पाहिल्याचा दावा केला आहे. या जहाजासंदर्भात अनेक समजुती असून यावर शो आणि सिनेमेदेखील बनवण्यात आले आहेत. 1641 मध्ये जहाजाचे कॅप्टन हेन्रिक वेन हॉलंडहून ईस्ट इंडिजच्या दिशेने निघाले होते. तेव्हा वाटेत त्यांनी काही बदल केले. त्यांनी जहाज केप ऑफ गुड होपकडे वळण्याचे आदेश दिले. मात्र कॅप्टनच्या हा निर्णय जहाजात बसलेल्या प्रवाशांना मान्य नव्हता.

त्यावेळी प्रवासी खूपच नाराज झाले. अशातच या जहाजाला भीषण वादळाचा सामना करावा लागला होता. या वादळाचा फटका प्रवाशांना बसला. वादळाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की, त्यात ते जहाज कोलमडून पडले. अनेक प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तेव्हापासून जहाज समुद्रात भरटकत असल्याचे म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे या जहाजाचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. फ्लाइंग डचमन या जहाजाबाबत शोधदेखील घेण्यात आला. तरीदेखील त्यामागील रहस्य संशोधकांना समजलेले नाही. त्यामुळे फ्लाइंग डचमॅन हे आजही एक रहस्य मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT