Animal Communication | प्राण्यांशी थेट संवादाच्या दिशेने शास्त्रज्ञांचे पाऊल 
विश्वसंचार

Animal Communication | प्राण्यांशी थेट संवादाच्या दिशेने शास्त्रज्ञांचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

लंडन : मानव आणि प्राण्यांमध्ये थेट संवाद (टू वे कम्‍युनिकेशन) सुरू होण्याच्या दृष्टीने विज्ञान जगतात एक क्रांतिकारी संशोधन समोर आले आहे. पक्ष्यांच्या आवाजातील गुंतागुंतीची भाषा डीकोड करणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथील संशोधिका ज्‍युली एली यांना प्राणी संवादाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा २०२६ च्या ‘कॉलर-डुलिटल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ज्‍युली एली यांनी ‘झेब्रा फिंच’ या अत्यंत जास्त आवाज करणाऱ्या गाणाऱ्या पक्ष्यांच्या ११ मुख्य आवाजांचा शोध लावला असून, त्यांच्या प्रत्येक आवाजाचा नेमका अर्थ काय होतो, हे शोधून काढले आहे. हे संशोधन 'द गार्डियन'ने प्रसिद्ध केले आहे.

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

झेब्रा फिंच पक्षी त्यांच्या विशिष्ट आवाजाच्या वैशिष्‍ट्येद्वारे (व्‍होकल सिंग्‍नेचर्स) एकमेकांना ओळखू शकतात. तसेच ते आपल्या आवाजातून स्वतःची ओळख आणि आपले वर्तन किंवा हेतू काय आहे, हे एकमेकांना कळवू शकतात. प्रयोगादरम्यान ज्‍युली एली यांना असे दिसून आले की, दोन वेगवेगळ्या आवाजांचे अर्थ जर एकच असतील, तर आवाजाची रचना वेगळी असूनही पक्षी कधीकधी गोंधळात पडायचे. यावरून हे सिद्ध होते की, पक्षी केवळ आवाजाला एक बाह्य उत्तेजक (स्‍टिम्‍युलस) म्हणून प्रतिसाद देत नाहीत, तर त्यांच्या मेंदूमध्ये त्या आवाजाच्या अर्थाची एक स्पष्ट प्रतिमा (मेंटल रिप्रेझेंटेशन) तयार झालेली असते. ज्‍युली एली यांनी या संशोधनासाठी १० वर्षांहून अधिक काळ या पक्ष्यांच्या आवाजाचे निरीक्षण आणि रेकॉर्डिंग केले. त्यानंतर प्रगत मशिन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून या आवाजांमध्ये माहिती कशी कोड केलेली असते, याचा अभ्यास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT