विश्वसंचार

…म्हणून मानवी डोळे पाहू शकतात लाखो रंगछटा

Arun Patil

न्यूयॉर्क : पेट्री डिशमध्ये तयार केलेल्या डोळ्यांमधील रेटिनाच्या सहाय्याने वैज्ञानिकांनी आता मानवी डोळ्यांच्या क्षमतेबाबत नवा खुलासा केला आहे. कशा प्रकारे 'अ' जीवनसत्त्वाचे एक रूप रंगाबाबत संवेदनशील पेशींची निर्मिती कशी करते हे यामधून दिसून आले आहे. अशा पेशींमुळेच आपण लाखो रंगछटा पाहू शकतो. तशी क्षमता कुत्रा, मांजर अशा अन्य प्राण्यांमध्ये असत नाही.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'प्लोस बायोलॉजी' नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संशोधनाचा उपयोग रंगांधळेपणा, वयानुसार होणारी डोळ्यांही हानी तसेच फोटोरिसेप्टर पेशींशी निगडीत अन्य आजारांना समजून घेण्यासाठी होऊ शकतो. कशाप्रकारे विशिष्ट जनुक रेटिनाला विशेष रंगसंवेदी पेशी बनवण्याचे निर्देश देते हे सुद्धा या संशोधनातून दिसून आले आहे. ही प्रक्रिया थायरॉईड हार्मोनने नियंत्रित असते असे पूर्वी मानले जात होते. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील संशोधक रॉबर्ट जॉनस्टन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, या रेटिनल ऑर्गेनॉयड्सने आपल्याला प्रथमच या विशिष्ट मानवीय वैशिष्ट्याबाबत अध्ययन करण्याची संधी दिली आहे.

माणूस म्हणून आपले काय वेगळेपण आहे, आपल्यामध्ये कोणती खासियत आहे हे समजून घेण्यासाठी हे उपयुक्त आहे. संशोधकांना आढळले की रेटिनोइक अ‍ॅसिड नावाचे एक अणू हे निश्चित करते की एक शंकुच्या आकाराची पेशी लाल किंवा हिरव्या प्रकाशाची जाणीव करण्याची क्षमता मिळवणार की नाही. सामान्य द़ृष्टी असलेले मनुष्य आणि मानवप्राण्याशी जवळचे असलेले प्रायमेट्स किंवा एप्समध्येच लाल संवेदक विकसित होतात.

SCROLL FOR NEXT