दोन व्यक्तींमध्ये चक्क स्वप्नात संभाषण घडवण्याची किमया. File Photo
विश्वसंचार

दोन व्यक्तींमध्ये चक्क स्वप्नात संभाषण घडवण्याची किमया

arun patil

वॉशिंग्टन : स्वप्नात आपण कुणाशी तरी बोलत असताना पाहत असतो, पण अर्थातच ते काही खरे नसते. मात्र आता खरोखरच दोन व्यक्ती स्वप्नात असताना त्यांच्यामध्ये संभाषण घडवून आणण्याचा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाने शक्य करून दाखवला आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच स्वप्नात दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे संभाषण घडवून आणल्याचा दावा केला. हा प्रयोग कॅलिफोर्निया स्टार्टअप रेमस्पेसने केला आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेल्या दोघांनी स्वप्नांच्या माध्यमातून संदेश पाठवला व प्राप्तही केला. स्टार्टअपचे संस्थापक मायकेल रेदुगा म्हणतात, ‘हा प्रयोग इनसेप्शन चित्रपटातील द़ृश्यासारखा आहे... कालपर्यंत स्वप्नात बोलणे ही विज्ञानात काल्पनिक गोष्ट वाटत होती, पण आज ते वास्तव आहे. जाणून घ्या कसा झाला हा प्रयोग...

आपापल्या घरात झोपलेल्या दोन सहभागींच्या मेंदूच्या लहरी आणि इतर पॉलीसोम्नोग्राफिक डेटा विशेष उपकरणांद्वारे दूरस्थपणे ट्रॅक केला गेला. सर्व्हरने पहिला सहभागी स्वप्नाळू स्थितीत पोहोचण्याची प्रतीक्षा केली. ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वप्नावस्थेतही कळते की तो स्वप्न पाहत आहे. यानंतर सर्व्हरने ‘रेमियो’ हा शब्द तयार केला आणि तो इअरबड्सद्वारे पाठवला. ‘रोमिओ’ ही संवेदनशील सेन्सरद्वारे शोधलेली ‘स्वप्न भाषा’ आहे. सहभागीने स्वप्नात त्याच शब्दांची पुनरावृत्ती केली आणि त्याचा प्रतिसाद सर्व्हरद्वारे संगहित केला. सुमारे 8 मिनिटांनंतर, दुसरा सहभागी स्वप्नाळू अवस्थेत गेला. त्याला पहिल्या सहभागीकडून मिळालेला संदेश पाठवला गेला. जागे झाल्यावर त्याने स्वप्नातील शब्दांची पुनरावृत्ती केली. या पहिल्या ‘स्वप्न गप्पा’ होत्या. झोपेशी संबंधित संशोधनात हा मैलाचा दगड ठरेल, असा दावा रेमस्पेसने केला. याशिवाय मानसिक आरोग्य सुधार व कौशल्य प्रशिक्षणासारख्या गोष्टींसाठी ते उपयुक्त ठरू शकते. रादुगा म्हणतात की, हे यश 5 वर्षांच्या गहन संशोधनाचे आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा परिणाम आहे. या वर्षी 24 सप्टेंबर आणि 8 ऑक्टोबर रोजी सुस्पष्ट स्वप्नांमध्ये पहिले प्रसारण झाल्यापासून संशोधक सतत तंत्रज्ञान सुधारत आहेत. प्रत्येक नवीन प्रयत्नाने आम्ही चांगले परिणाम साध्य करत आहोत. रॅमस्पेस सीमांना पुढे ढकलण्यासाठी पुढील आव्हानाची वाट पाहत आहे. 40 वर्षांच्या रादुगांना परिणामांबद्दल विश्वास आहे. 2023 मध्ये त्यांनी स्वतःच्या मेंदूमध्ये चिप बसवून स्वतःचा जीव धोक्यात घातला. मात्र, ती 5 आठवड्यांनंतर काढण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT