शनीच्या ‌‘टायटन‌’ची निर्मिती दोन चंद्रांच्या टकरीतून? 
विश्वसंचार

Saturn's rings : शनीच्या ‌‘टायटन‌’ची निर्मिती दोन चंद्रांच्या टकरीतून?

शनीच्या सौंदर्याचे आणि कड्यांचे रहस्य उलगडले

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : शनीचा सर्वात मोठा आणि धुक्याने वेढलेला चंद्र ‌‘टायटन‌’ हा दोन विशाल चंद्रांच्या भीषण टकरीतून निर्माण झाला असावा, असा दावा खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. या एका घटनेमुळे केवळ टायटनच बनला नाही, तर शनीची जगप्रसिद्ध वलये आणि इतर चंद्रांचे विचित्र गुणधर्मही अस्तित्वात आले असावे, असे या संशोधनातून समोर आले आहे.

2004 मध्ये जेव्हा ‌‘कॅसिनी-हायजन्स‌’ हे यान शनीच्या प्रणालीत पोहोचले, तेव्हा तिथे अनेक गूढ गोष्टी पाहायला मिळाल्या. यामध्ये पुढील प्रमुख बाबींचा समावेश होता. टायटन : सौरमालेतील एकमेव असा चंद्र ज्याला स्वतःचे वातावरण आहे. हायपेरियन : एखाद्या सच्छिद्र दगडासारखा दिसणारा चंद्र. आयपेटस : दोन वेगवेगळ्या रंगांचे गोलार्ध असलेला आणि शनीच्या कक्षेपासून 15.5 अंश कोनात झुकलेला चंद्र. शनीची वलये : जी केवळ 10 कोटी वर्षांपूर्वी तयार झाली असावीत, असा अंदाज आहे. डएढख इन्स्टिट्यूटचे मतिजा कुक यांच्या नेतृत्वाखालील टीमला आता असे वाटते की, दोन चंद्रांच्या विलीनीकरणामुळे घडलेल्या साखळी क्रियांनी शनीच्या या सर्व वैशिष्ट्यांना जन्म दिला. शनीचा अक्ष सूर्याभोवतीच्या कक्षेच्या तुलनेत 26.7 अंशांनी झुकलेला आहे. शास्त्रज्ञांना पूर्वी असे वाटायचे की, शनीच्या फिरण्याची गती आणि दूरवरच्या नेपच्यून ग््राहाची कक्षा यांचा एकमेकांशी गुरुत्वाकर्षण संबंध आहे, ज्यामुळे शनी एका बाजूला झुकला आहे. याच झुकलेल्या कोनामुळे आपण पृथ्वीवरून शनीची वलये स्पष्ट पाहू शकतो. कॅसिनी यानाने शनीच्या अंतर्गत भागातील वस्तुमानाचे मोजमाप केले तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली. शनीच्या मध्यभागी पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त वस्तुमान एकवटलेले आहे. यामुळे शनीचा ‌‘मोमेंट ऑफ जडत्व‌’ बदलला असून, तो आता नेपच्यूनच्या कक्षेसोबतच्या गुरुत्वाकर्षण तालातून बाहेर पडला आहे. असे दिसते की, ‌‘कोणत्या तरी मोठ्या घटनेने शनीला नेपच्यूनच्या तालातून बाहेर खेचले आणि शनीच्या आतील वस्तुमानाचे पुनर्वितरण झाले. पण ही घटना नक्की काय होती?‌’ असा प्रश्न या संशोधनातून उपस्थित झाला आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, टायटनची निर्मिती ज्या टकरीतून झाली, तिनेच शनीच्या फिरण्याच्या अक्षावर परिणाम केला असावा. या भीषण टकरीतून उडालेल्या अवशेषांमधूनच शनीची सुंदर वलये तयार झाली असावीत आणि इतर चंद्रांच्या कक्षाही विस्कळीत झाल्या असाव्यात, अशी शक्यता या संशोधनात मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT