Russia moon mission: पुढील दशकात रशिया चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार Pudhari
विश्वसंचार

Russia moon mission: पुढील दशकात रशिया चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार

रशियाने पुढील दशकात चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे

पुढारी वृत्तसेवा

मॉस्को : रशियाने पुढील दशकात चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाचा उद्देश त्यांच्या चंद्र अवकाश कार्यक्रमाला आणि रशिया-चीन संयुक्त संशोधन केंद्राला ऊर्जा पुरवणे हा आहे. जगातील प्रमुख महासत्ता पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहाचे (चंद्राचे) अन्वेषण करण्यासाठी वेगाने पुढे येत आहेत.

1961 मध्ये सोव्हिएत अंतराळवीर युरी गागारिन हे अंतराळात जाणारे पहिले मानव ठरल्यापासून, रशियाने अंतराळ संशोधनात एक आघाडीची शक्ती म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. मात्र, गेल्या काही दशकांत ते अमेरिका आणि आता वाढत्या प्रमाणात चीनच्या मागे पडले आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये रशियाच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला, जेव्हा त्यांचे मानवरहित लुना-25 मिशन चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना पृष्ठभागावर कोसळले. तसेच, एकेकाळी रशियाची खासियत असलेल्या अवकाश यानांच्या प्रक्षेपणात एलॉन मस्क यांनी क्रांती घडवली आहे. रशियाची सरकारी अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने एका निवेदनात म्हटले आहे की, 2036 पर्यंत चंद्रावर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची त्यांची योजना आहे आणि त्यासाठी त्यांनी लावोचकिन असोसिएशन या एरोस्पेस कंपनीसोबत करार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT