विश्वसंचार

पाण्यातून ऑक्सिजन वेगळा करणार ‘रोबो-केमिस्ट’

दिनेश चोरगे

बीजिंग : चिनी संशोधकांनी आता एक असा 'रोबो-केमिस्ट' बनवला आहे जो मंगळावरील 'पाण्या'तून ऑक्सिजन वेगळा करू शकेल. मंगळावर एकेकाळी वाहत्या पाण्याच्या नद्या, सरोवरे होती. या पाण्याचा अंश असणारे खडक तिथे असू शकतात व त्यांच्यावर हा रोबो प्रयोग करील. हा रोबो 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या सहाय्याने काम करील व त्याला मंगळावरील आपल्या कामात मानवी सहाय्याची गरज लागणार नाही.

भविष्यात मंगळावर जाण्याची माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. एलन मस्कसारखे उद्योजक तर मंगळावर मानवी वसाहतच स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र, हे घडण्यासाठी मंगळावर तेथील साधनसंपत्तीचा वापर करूनच माणसाला तग धरून राहावे लागणार आहे. त्याद़ृष्टीने आता हा चीनी रोबो सहायक ठरू शकतो. 'ऑक्सिजन इव्होल्युशन रिअ‍ॅक्शन' (ओईआर) या प्रक्रियेद्वारे तो पाण्यातून ऑक्सिजन वेगळा करील. 'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांनी या प्रयोगासाठी मंगळावरील आणि मंगळावरून आल्यासारख्या वाटणार्‍या उल्कांच्या पाच नमुन्यांवर चाचण्या केल्या. त्यांनी बनवलेल्या हालचाल करू शकणार्‍या रोबोद्वारे त्यामधून ऑक्सिजन वेगळा करण्याची चाचणी घेण्यात आली.

SCROLL FOR NEXT