Drone Blood Transport | ड्रोनमुळे रक्त वाहतुकीत क्रांती  Pudhari File Photo
विश्वसंचार

Drone Blood Transport | ड्रोनमुळे रक्त वाहतुकीत क्रांती

आरोग्यसेवेत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील आरोग्यसेवेत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे संकेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) ताज्या अभ्यासातून मिळाले आहेत. या अभ्यासानुसार, ड्रोनच्या मदतीने रक्त आणि त्याचे घटक दुर्गम व आव्हानात्मक भागात सुरक्षितपणे पोहोचवता येतात, आणि या प्रक्रियेत रक्ताच्या गुणवत्तेत कोणताही बदल होत नाही.

आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी विविध भौगोलिक आणि हवामानातील परिस्थितीत ड्रोनद्वारे रक्त वाहतुकीचे प्रयोग केले. या प्रयोगांमध्ये रक्तातील घटक, त्यांची रासायनिक व जैविक गुणवत्ता, तसेच वाहतुकीनंतरचे परिणाम तपासण्यात आले. अभ्यासात स्पष्ट झाले की, ड्रोनद्वारे वाहतूक केलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये कोणताही नकारात्मक बदल आढळला नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत, नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी रक्त आणि त्याचे घटक तातडीने पोहोचवणे शक्य होणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण आणि डोंगराळ भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असून, वेळेत रक्त मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. ‘आयसीएमआर’च्या या निष्कर्षामुळे देशभरातील आरोग्य व्यवस्थेत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी या उपक्रमाचे स्वागत करत, ड्रोनमुळे रक्त वाहतुकीतील विलंब आणि अपाय टाळता येईल, असे मत व्यक्त केले आहे. भविष्यात, रक्त बँक आणि रुग्णालयांमध्ये ड्रोनद्वारे रक्तपुरवठा ही नवी सामान्य प्रक्रिया ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT