‘सुपर अर्थ’ 
विश्वसंचार

संशोधकांनी शोधला पृथ्वीसारखा ‘सुपर अर्थ’

Super Earth : तेथे वातावरणही पृथ्वीसारखेच असू शकते, संशोधकांचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद : पृथ्वीशिवाय आणखी कोणत्या ग्रहावर जीवन आहे का, या प्रश्नाने शास्त्रज्ञ-संशोधक नेहमीच पछाडलेले असतात. वर्षांनुवर्षे त्यावर सखोल संशोधनही सुरू आहे. अशाच एका संशोधनात असे आढळून आले आहे की, असाही एक ग्रह आहे, जिथे आपल्या पृथ्वीसारखे जीवन शक्य आहे.

हा ग्रह फक्त 20 प्रकाशवर्षे दूर आहे आणि त्याला ‘एचडी 20794 डी’ असे नाव देण्यात आले आहे. तो सूर्यासारख्या तार्‍याभोवती फिरतो आणि त्याचा वातावरणही आपल्या पृथ्वीसारखेच असू शकते, असा विश्वास आहे. यामुळेच त्याला ‘सुपर अर्थ’च्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ‘एचडी 20794 डी’ हा ग्रह 647 दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. या ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याच्या तार्‍याच्या ‘राहण्यायोग्य क्षेत्रात’ आहे. राहण्यायोग्य क्षेत्र म्हणजे ते क्षेत्र जिथे ग्रहावर पाणी द्रवरूपामध्ये असण्याची शक्यता असते आणि जिथे पाणी असते तिथे जीवनाची शक्यताही वाढते. शास्त्रज्ञांसाठी हा खूप रोमांचक शोध आहे, कारण जिथे पाणी आहे तिथे जीवनाची शक्यताही आहे.

आता या ग्रहाचे वातावरण कसे आहे, याबाबत अद्याप ठोस दुजोरा मिळालेला नाही. पण, इथे पृथ्वीसारखी हवामान आणि वातावरणीय परिस्थिती आढळल्यास, तो आपल्यासाठी खूप रोमांचक शोध असेल. स्पेनच्या इन्स्टिट्यूटो डी अ‍ॅस्ट्रोफिझिका डी कॅनारियास आणि युनिव्हर्सिडाड डी ला लागुनाच्या शास्त्रज्ञांनी या ग्रहाचा शोध लागल्याची पुष्टी केली आहे. शास्त्रज्ञ ‘एचडी 20794 डी’ नावाच्या तार्‍याचा अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत. हा तारा आपल्या सूर्यापेक्षा थोडा लहान आहे आणि त्याच्याभोवती आधीच दोन सुपर अर्थ ग्रह शोधले गेले आहेत.

‘एचडी 20794 डी’चे वस्तुमान पृथ्वीच्या सहा पट आहे आणि तो 647 दिवसांत आपल्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो, मंगळाला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणार्‍या वेळेपेक्षा हा कालावधी फक्त 40 दिवस कमी आहे. या ग्रहाची परिस्थिती जीवनासाठी आदर्श बनवते, कारण त्याचे तापमान आणि इतर परिस्थिती पाणी टिकवून ठेवण्यासाठी अनुकूल असू शकते. हा शोध 20 वर्षांच्या संशोधनाचा परिणाम आहे आणि तो खगोलशास्त्राच्या प्रसिद्ध जर्नल, अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकाशित झाला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा शोध आपल्याला पृथ्वीसारख्या ग्रहांचे वातावरण अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT