विश्वसंचार

आयर्लंडमधील किल्ल्याखाली लोहयुगातील मंदिराचे अवशेष

Pudhari News

लंडन :

उत्तर आयर्लंडमधील नेवन फोर्ट या किल्ल्याखाली लोहयुगातील मंदिराचे अवशेष असल्याचा छडा लागला आहे. रिमोट सेन्सिंग टेक्निकच्या सहाय्याने हे अवशेष शोधण्यात आले आहेत. लोहयुगातील तसेच मध्ययुगातील इमारतींचे अवशेष तिथे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

नेवन किल्‍ला हा अर्माग शहरालगत आहे. उल्स्टर या प्राचीन काळातील प्रांताची ही राजधानी होती. आयरिश भाषेत त्याला 'उलैद' असे म्हटले जाते. अनेक आयरिश दंतकथा तसेच ऐतिहासिक साहित्याशी संबंधित बाबी या ठिकाणाशी निगडीत आहेत. त्यामुळेच हे पुरातत्त्व संशोधनाच्या द‍ृष्टीनेही एक महत्त्वाचे ठिकाण आहे. कांस्य तसेच लोहयुगाच्या काळात हे धार्मिकद‍ृष्ट्याही प्रसिद्ध स्थळ होते. इसवी सनपूर्व एक हजार ते इसवी सन 400 या काळापर्यंत हे ठिकाण संपन्‍न होते. प्रागैतिहासिक व मध्ययुगीन आयर्लंडच्या इतिहासात या ठिकाणाचे मोठे महत्त्व आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT