विश्वसंचार

डोळ्यांवर पट्टी बांधून गणेशमूर्ती बनवण्याचा विक्रम

Pudhari News

मुंबई : अनेक लोक अत्यंत सुबक गणेशमूर्ती बनवत असतात. मात्र, येथील रमा शाह यांची गणेशमूर्ती बनवण्याची पद्धत 'हट के' आहे. त्या चक्‍क डोळ्यांवर पट्टी बांधून गणेशमूर्ती बनवतात. याबाबत त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात आली आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्या सातत्याने डोळ्यांवर पट्टी बांधून गणेशमूर्ती बनवत आहेत.

रमा शाह यांनी आतापर्यंत अशा पद्धतीने चार लाखांपेक्षाही अधिक गणेशमूर्ती बनवल्या आहेत. त्यांनी अवघ्या तीन मिनिटांत गणेशाची सर्वात छोटी मूर्ती बनवण्याचाही विक्रम केला होता. त्याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली आहे. अमेरिकेतील 'रिप्ले बिलीव इट ऑर नॉट' या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या पॅनेलमध्येही त्या झळकल्या आहेत. केवळ 99 दिवसांमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून गणपतीच्या 9,999 मूर्ती बनवण्याच्या विक्रमामुळे त्या या कार्यक्रमात झळकल्या होत्या. स्वतः बनवलेल्या 18 हजारांपेक्षाही अधिक मूर्तींचे एकाच ठिकाणी प्रदर्शन करण्याच्या त्यांच्या विक्रमाचीही गिनिज बुकने नोंद घेतली होती.

SCROLL FOR NEXT