लंडन : भाज्यांचे दर वाढले की, आपल्याला किलोमागे 100-200 रुपये जास्त वाटतात; पण जगात अशी एक भाजी आहे जिची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. सोन्याच्या दराने विकल्या जाणार्या या भाजीचे नाव आहे ‘हॉप शूटस्’. आंतरराष्ट्रीय बाजारात या भाजीची किंमत सुमारे 1000 युरो म्हणजेच साधारण 90 हजार ते 1 लाख रुपये प्रतिकिलो इतकी आहे.
हॉप शूटस् म्हणजे ‘हॉप’ या वनस्पतीची कोवळी देठं किंवा फांद्या. प्रामुख्याने या वनस्पतीचा वापर बिअर बनवण्यासाठी केला जातो. मात्र, याच्या सुरुवातीच्या कोवळ्या कोंबांचा वापर भाजी आणि सॅलड म्हणून केला जातो. युरोपातील अनेक देशांमध्ये याला अत्यंत ‘लग्झरी फूड’ मानले जाते. फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये या भाजीला मोठी मागणी असते. हॉप शूटस्ची किंमत गगनाला भिडण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत :
अतिशय कष्टाची कापणी : ही भाजी पिकवणे आणि त्याची कापणी करणे खूप कष्टाचे काम आहे. कोवळी देठं अतिशय सावधगिरीने हाताने तोडावी लागतात. कमी उत्पादन : एक शेतकरी दिवसभरात खूपच कमी प्रमाणात याची कापणी करू शकतो.
मर्यादित उपलब्धता : ही भाजी वर्षातून खूप कमी काळासाठी उपलब्ध असते, त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने किंमत वाढते. तज्ज्ञांच्या मते, हॉप शूटस् केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात. संशोधनानुसार, यात प्रतिजैविक (अँटीबायोटिक) गुणधर्मदेखील आढळतात. गेल्या काही काळापासून सोशल मीडिया आणि इंटरनेटवर या 1 लाख रुपये किलोच्या भाजीची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात या भाजीची लागवड सध्या अत्यंत मर्यादित असली, तरी ‘प्रीमियम फूड’ मार्केटमध्ये याबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य लोकांसाठी तर सोडाच; पण मोठ्या श्रीमंतांसाठीही ही जगातील सर्वात महागडी भाजी खरेदी करणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.
एक शेतकरी दिवसभरात खूपच कमी प्रमाणात याची कापणी करू शकतो. मर्यादित उपलब्धता : ही भाजी वर्षातून खूप कमी काळासाठी उपलब्ध असते, त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने किंमत वाढते. तज्ज्ञांच्या मते, हॉप शूटस् केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात. संशोधनानुसार, यात प्रतिजैविक (अँटीबायोटिक) गुणधर्मदेखील आढळतात. गेल्या काही काळापासून सोशल मीडिया आणि इंटरनेटवर या 1 लाख रुपये किलोच्या भाजीची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात या भाजीची लागवड सध्या अत्यंत मर्यादित असली, तरी ‘प्रीमियम फूड’ मार्केटमध्ये याबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य लोकांसाठी तर सोडाच; पण मोठ्या श्रीमंतांसाठीही ही जगातील सर्वात महागडी भाजी खरेदी करणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.